


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.20मार्च):- प्रख्यात इतिहास संशोधक तथा प्रसिद्ध प्रबोधनकार नागपूर येथील विद्यापीठात असणारे मा.म.देशमुख यांचे 19 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी पहाटे 3:30 वाजता निधन झाले.त्यामुळे सत्य लिहिणारा,सत्य बोलणारा इतिहास संशोधक आपल्या मधून निघून गेल्यामुळे मा.म.देशमुख यांची जागा कदापिही भरून निघणार नाही सामाजिक परिवर्तनाची चळवळ मा.म.देशमुख यांनी चालवत असताना इतिहासातील संशोधन करत ब्राह्मणवादी इतिहास लेखनाला छेद दिला.मराठा सेवा संघ,शिवधर्म,शिवराज्य पार्टी यासारखी विचारपीठ तयार होत असताना सिंहाचा वाटा उचलला.
मारुती महादेव देशमुख नावामध्ये देव असतानाही आपल्या व्याख्याना मध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही केले. असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले गंगाखेड येथे यांनी आनंद निवासस्थानी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी छोट्या खाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार प्रा.अंकुश वाघमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी मंचावर, बार्टीची मुंजाजी कांबळे, उपा.नारायण साळवे.एड.उत्तम काळे,गुणवंत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते राठोड,मिलिंद साळवे,शुद्धोधन,भालेराव,राहुल काचोळे,प्रसंगीत मस्के,कैलास सावंत,प्रभाकर गायकवाड,टायगर मस्के,बाळासाहेब कदम,यांची उपस्थिती होती.या प्रसंगी मुंजाजी कांबळे,मिलिंद साळवे,नारायण साळवे, यांचीही मनोगती झाली.सूत्रसंचालन/आभार प्रभाकर गायकवाड यांनी व्यक्त केले.















