Home महाराष्ट्र सांगडी येथे दोन दिवसीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन संपन्न : ग्रंथदिंडी व...

सांगडी येथे दोन दिवसीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन संपन्न : ग्रंथदिंडी व पुरस्कार वितरण, परिसंवादाने गाजले संमेलन 

161

✒️सांगडी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 सांगडी(दि.10मार्च):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि सांगडी श्रीगुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने सांगडी (मंडल -बेला) जि. आदीलाबाद येथे दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन संपन्न झाले. डॉ. मोतीजी महाराज श्रीगुरुदेव सेवाश्रमाच्या प्रांगणात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन आदिलाबाद जि. प. चे माजी अध्यक्ष सुहासिनी रेड्डी चिट्टाला यांचे हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून पुणे येथील गोविज्ञान अभ्यासक पंढरीनाथ चंदनखेडे , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळ पदवाड, नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, युवा फिल्म निर्माते अनुप श्रीरामे (शंकरपूर), स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे, जरूड गावाचे माजी सरपंच सुधाकर मानकर, विठ्ठल पुनसे (नागपूर ), सौ. विजया दहेकर (वणी), मारोतराव इचोडकर (गडचिरोली), डॉ . चंद्रकांत शहासने (पुणे), डाखरे महाराज (वडगाव)आदींची उपस्थिती होती.

      संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे म्हणाले की, साहित्य विश्वातील श्रेष्ठ कलाकृती म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ आहे . याच ग्रामगीतेतील पंधरावा अध्याय गोवंश सुधार असून अलीकडच्या काळात गोमातेची घटती संख्या लक्षात घेता गोमातेचे संवर्धन करणे गरजेचे आहे , असे ते म्हणाले. यावेळी सुहासिनी रेड्डी म्हणाल्या की, राष्ट्रसंताचे समग्र साहित्य मानवतावादी तसेच परिवर्तनवादी आहे. त्यामुळे हे साहित्य नव्या पिढींमध्ये रूजले गेले पाहिजे , असे प्रतिपादन त्यांनी केले.

    राष्ट्रसंत साहित्य स्वकाळाच्या पलीकडे जाऊन भावी काळाची जडणघडण करण्याची ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले . स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे यांनी प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन एड. राजेंद्र जेनेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजि. विलास उगे यांनी मानले‌ . यावेळी उध्दव साबळे (नागपूर) यांच्या ग्रामगुज या ग्रंथाचे प्रकाशन ,केशवराव दशमुखे संपादित दै. गडचिरोली पत्रिकेच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

          दुपारच्या सत्रात श्रीगुरुदेव सेवा मंडळातील माणिक माेती या विषयावर परिसंवाद ग्रामगीताचार्य बंडाेपंत बाेढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी गीताचार्य श्री तुकारामदादा यांचे सेवाकार्य आणि लेखन यावर प्रा.

डाॅ. श्रावण बानासुरे (बल्लारपूर) यांनी प्रकाश टाकला तर, आद्य ग्रामगीताचार्य रा. मो. बेलूरकर यांच्या लेखन संबंधाने उद्धव साबळे यांनी विचार मांडले , विठ्ठलराव डाखरे यांनी डॉ . मोतीजी महाराज जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर श्रीकांत धाेटे यांनी प्रा. रघुनाथ कडवे यांच्या ११५ साहित्यकृती संबंधाने विचार व्यक्त केले. सायंकाळच्या सामुदायिक प्रार्थनेवर ज्येष्ठ प्रचारक लटारू मत्ते (राजुरा ) यांचे चिंतन प्रस्तुत झाले.‌ तर संमेलनाध्यक्षाची मुलाखत प्रा. नामदेव मोरे यांनी घेतली. प्रबोधन संध्या सत्रात सुधाकर चौधरी (गोदोंडा ) यांचे कीर्तन, चेतन ठाकरे व अनुराग मुळे (आरमोरी) यांचे भारूड, पालिकचंद बिसणे(सिंदीपार) यांचे बासरी वादन तसेच पुरूषोत्तम लांजेवार (कवडशी) यांचे एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम संपन्न झाले.

    संमेलनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे वतीने देण्यात येणारे विशेष पुरस्कार सुधाकर मानकर, केशव दशमुखे, पुरूषोत्तम लांजेवार, सुधाकर चौधरी, प्रेमेश्वर बारसागडे, मारोती साव, नामदेव पिज्दूरकर तसेच आदर्श विद्यार्थी सन्मान कु. मोक्शा सामावार,कु.तृप्ती मालेकर , सुरीदास अड्डीकवार,वेदन नवघरे यांना प्रदान करण्यात आला.

सकाळच्या राष्ट्रसंत साहित्य दिंडीत राष्ट्रसंताची ग्रामगीता, श्री तुकारामगाथा, विवेकानंद साहित्य, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बायबल , कुराण आणि भारतीय संविधान ग्रंथ ठेवण्यात आले होते. तर महाराष्ट्र नशाबंदी मंडळ चंद्रपूर च्या वतीने संमेलन स्थळी संघटक संदीप कटकुरवार यांनी व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी लावली होती. संमेलनाचा समारोप आ. पायल शंकर यांच्या उपस्थितीत झाला. ते म्हणाले की, राष्ट्रसंताचे साहित्य माणूस या संकल्पनेशी नाते जोडते . त्यांचे साहित्य म्हणजे जीवनसृष्टी देणारे ज्ञानभांडार आहे , ते साहित्य जगणे शिकवते. तसेच राष्ट्रसंतांचे परमशिष्य ब्र. डॉ .मोतीजी महाराज यांनी राष्ट्रसंत साहित्याचा प्रचार आणि प्रसार तेलंगणा स्टेट मोठ्या प्रमाणात केला, असे प्रतिपादन आम. पायल शंकर यांनी केले . याप्रसंगी संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, साहित्य प्रसारक अर्जुन पारूडकर (किल्लारी) , परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, कवी अरुण झगडकर (गोंडपिपरी), धम्ममित्र नामदेव गेडकर , स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे आदींची उपस्थिती होती. यावेळी सौ. शशिकला गावतुरे (मुल) यांच्या ‘ माह्या झाडीमंदी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पायल शंकर यांच्या हस्ते झाले.

संमेलनात तीन ठराव पारित करण्यात आले.

१. राष्ट्रसंतांचे साहित्य तेलंगणा स्टेट मधील शालेय तथा विद्यापीठ अभ्यासक्रमात लावण्यात यावे.

२. सांगडी येथील डॉ. मोतीजी महाराज श्रीगुरुदेव सेवाश्रमाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

३. राष्ट्रसंत विचारधारा अध्यासन तेलंगणा स्टेट मधील सर्व विद्यापीठात सुरू करण्यात यावे.

 ———

समारोपिय कार्यक्रमात बळीराम बोबडे, सुभाष पावडे, उध्दव नारनवरे, सचिन झाडे, इंदिरा कुडे, चेतन ठाकरे, विनायक सोयाम, सतिश देवाळकर, प्रल्हाद खुणे, डॉ. श्रावण बाणासुरे, उध्दव बेलूरकर, डॉ. हर्षानंद हिरादेवे , सामावार,खाडे आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   मी अनुभवलेली एक ओवी हा परिसंवाद प्रेमलाल पारधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी. त्यात विलास चाैधरी, हरिश्चंद्र बाेढे, श्यामसुंदर कारेकर, डाॅ. उदार ,महादेव हुलके, गजानन बाेबडे, खुशाल गाेहाेकार,पांडुरंग शेंडे, हुसेन किन्नाके, माेहन वडस्कर तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी अनुभव कथन केले. त्यानंतर डाॅ. माेतीजी महाराज यांना माैन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . 

  कार्यक्रमाचे नियोजन एड. राजेंद्र जेनेकर , संजय तिळसमृतकर, रविंद्र भेदोडकर , श्रीकांत धोटे, चंदू पाथोडे, शिवाजी भेदोडकर , मनोहर पासपुते स्थानिक आयोजन समितींनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here