Home महाराष्ट्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्य विनम्र अभिवादन!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्य विनम्र अभिवादन!

175

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10मार्च):-क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्य क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व समितिचे सर्व पदाधिकारी यांनी क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

“नव्याने निर्माण झालेली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीने पुढाकार घेऊन नूतन कार्याला सुरुवात केली.

नवनिर्मित समितीचे अध्यक्ष समितीचे सर्व पदाधिकारी यांनी फुले शाहू, आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ,रमाई, सावित्रीच्या सामाजिक कार्याची चळवळ गतिमान करण्याचा दृढ संकल्प आजच्या स्मृतिदिनी करण्यात आला.”

या वेळी समितीचे उपाध्यक्ष मुरलीधर जाधव,लक्ष्मणराव आगाशे,कोषाध्यक्ष आत्माराम जाधव,सौ. वर्षा आ.जाधव, कार्याध्यक्ष नारायण ठोके,सचिव उमाकांत सोनटक्के,सहसचिव ॲड.चंद्रकांत शामसुंदर, प्रसिध्दी प्रमुख राजेश ढोले,संघटक संजय भोने,भूमेश्वर डोक, रॅली प्रमुख ओमकार सोनटक्के,सदस्य दिनेश वेळुकर,सुनील पां.गवळी,शिवाजी सारंगे,भुमेश्वर डोक, विशाल पोले, संदीप मगर,प्रज्ञापर्व समिती 2025 चे अध्यक्ष मिलिंद जाधव,सुखदेवराव भगत, ल.पू.कांबळे यांचेसह अनेक समाज बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here