


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.२३फेब्रुवारी):-भारतीय बौद्ध महासभा शाखा गंगाखेडच्या वतीने बार्टी मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा ठिकाणी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून चमत्काराचे सादरीकरणासह प्रबोधन करण्यात आले याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्यात ते म्हणाले गाडगेबाबा आपल्या श्रोत्यांना सांगत तुम्ही देवळात जाऊ नका,मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका,अडाणी राहू नका, पोथी पुराणे,मंत्र तंत्र, देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका.
गाडगेबाबा समाजातील अज्ञान,अंधश्रध्दा,भोळ्या समजूती,अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी कीर्तन या माध्यमांचा अवलंब केला त्यांनी लोकांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून दिली आणि लोकांना उपदेश करत चोरी करू नका,व्यसनाच्या आहारी जाऊ नका,देवा धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातीभेद पाळू नका.तिर्थी धोंडो पाणी देव रोकडा सज्जनी आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधू ओळखावा देव तेथेची जानावा त्यांनी माणसात देव शोधला अशी गाडगेबाबांनी आपल्या श्रोत्यांना समजून सांगत.
यानंतर अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय डोंगरे यांनी नारळातून करणी काढणे,मंत्राने अग्नी पेटविने,चिठीतील नाव ओळखणे इत्यादी चमत्कार करून त्यामागील कारण स्पस्ट केले उपस्थित श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौध्दाचार्य नवनाथ साळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बौध्दाचार्य लक्ष्मण वाव्हळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ उपासक उपसिका यांनी परिश्रम घेतले.














