Home महाराष्ट्र संत शिरोमणी नरहरी महाराज यांची स्मृतिदिनी अभिवादन !

संत शिरोमणी नरहरी महाराज यांची स्मृतिदिनी अभिवादन !

308

▪️सोनार समाजाच्या वतीने २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा व ७ विशेष व्यक्तींचा सत्कार !

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.17फेब्रुवारी):-शहरात समस्त सुवर्णकार बांधव एकत्रित येऊन दरवर्षी नरहरी महाराजांचे पुण्यतिथी साजरी करत असतात परंतु यंदा नवीन काही करावे म्हणून नरहरी महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांही मोठ्या उत्साहात सहभागी झाल्यात व टाळ वाजवत फुगडी खेळत तसेच वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी यांनी अभंग म्हणत मिरवणुकीची शोभा वाढवली. आजच्या दिवशी समस्त सुवर्णकार बांधवांनी त्यांची दुकाने बंद ठेवून तसेच संपूर्ण कुटुंबासह कार्यक्रमात उपस्थित राहून मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची शोभा वाढवली.

         नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याच पद्धतीत समाजातील काही व्यक्तींनी विशेष कामगिरी करत आपल्या समाजाचे नाव उंच केलेले आहे अशा व्यक्तींचा सुद्धा सन्मान समाजातर्फे करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावर अध्यक्षस्थानी श्री ईश्वर शेठ सोनार उपस्थित होते तसेच श्री दत्तात्रय शेठ सोनार, श्री सुधाकर शेठ वानखेडे, श्री सूर्यकांत शेठ विंचुरकर, श्री विजय शेठ सोनार, श्री दिलीप शेठ चव्हाण व श्री दीपक शेठ बागुल आजच्या कार्यक्रमाचे अन्नदाते श्री दिगंबर शेठ मोरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे धरणगाव शहरातील शिवसेनेचे श्री पप्पू भावे, श्री विलास महाजन व विश्वकर्मा योजनेबद्दलची माहिती देण्यासाठी श्री समीर भाटिया उपस्थित होते.

या कार्यक्रमात जवळपास 22 विद्यार्थ्यांचा व 7 विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अभय शेठ सोनार प्रास्ताविक श्री सुनील शेठ घोडेस्वार व आभार श्री धीरज बागुल यांनी मानले.

सायंकाळी श्री ह भ प राजेंद्र महाराज कासोदेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त सुवर्णकार समाज बांधव यांनी मोठे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here