Home महाराष्ट्र का जातात लोक काशी, मथुरा, प्रयाग?

का जातात लोक काशी, मथुरा, प्रयाग?

271

मनुष्याचे जिवन सरासरी साठ वर्षांचे होते. आता अन्नधान्य आणि औषधी उपलब्धी मुळे वाढलेले आहे. शंभर पर्यंत. सरासरी ऐंशी झाले आहे. काही लोक बालपण, शाळा, शिक्षण, लग्न, नोकरी कामधंदा, पोरं बाळ असे जगून पन्नास पर्यंत कंटाळतात. बायकोला नवरा, नवऱ्याला बायको नको वाटायला लागते. पोरं बाळ नातरे यातून मन उदास होऊ लागते. तेंव्हा ती माणसे पोरकी होऊ लागतात. आतून मेलेली असतात. मरण येत नाही म्हणून जगत असतात. त्यांना आता स्वर्गात जाऊन जगायचे असते.

                                                    या संधीचा फायदा घेऊन बाबा, बुवा, पाखंडी त्यांची शिकार करतो. ईश्वराशी भेट करून देऊ, स्वर्गात नेऊन देऊ असे प्रलोभन दाखवतो. ही अज्ञानी बाया माणसे भ्रमित होतात. बळी पडतात. लांडग्याच्या मागे बकरी पळते तसे पळतात.

                                            संसारात उदास, निराश, हताश झालेली माणसे काशी, मथुरा, प्रयाग ला पळ काढतात. जे कळत नाही, दिसत नाही त्यांच्यामागे धावतात. ही स्वर्गाची वाट आहे, असे समजतात. मी काशीला मेलो तर स्वर्गात जाईन, अशा भ्रमात राहातात. असे असते तर काशी, मथुरा, प्रयाग, पंढरपूर मध्ये वास्तव्य करणारी माणसे स्वर्गात पोहचली असती.

                                  काळबादेवीच्या यात्रेत बाया माणसे मुले गर्दीत चेंगरली गेली. मेली. रेवदंडाला महिला चेंगरून मेल्या. आणि आता प्रयाग ला गर्दीत चेंगराचेंगरीत मेले. पाण्यात पडून बुडून मेले. हे तिर्थक्षेत्र असते तर असे विपरीत घडले नसते. तेथे ईश्वर असता तर असे होऊ दिले नसते.

     मी ग्रामीण भागातील माणूस. माझे निरीक्षण आहे. जी माणसे वारंवार तिर्थक्षेत्र जाऊन वाऱ्या करतात, त्यांचे प्रापंचिक जिवन उध्वस्त झाले आहे. जर तिर्थक्षेत्रावर जाऊन ईश्वर भेटला असता तर असे उध्वस्त झाले नसते.

    अशी माणसे विचार करीत नाहीत. कदाचित फुरसत मिळत नाही. कि आपण जन्माला आलो तर दूध इतरांनी पाजले, शाळा इतरांची होती, दवाखाना इतरांचा होता. मी लाभ घेतला. तर मी यांचे ऋण फेडण्यासाठी काम केले पाहिजे. इतरांच्या हिताचे काम केले पाहिजे. माझे जगणे सुकर झाले आहे तर इतरांचे जगणे सुकर केले पाहिजे. जगा आणि जगू द्या. जगा आणि जगवा. हाच तर खरा धर्म आहे. 

      सज्जन माणसांचे सहज जगणे हिच तर तिर्थयात्रा असते. सज्जनांची पायवाट हाच तर धर्म असतो.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here