


✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.21जानेवारी):- वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये भूगोलशास्त्र विभागामार्फत दि. 18 जानेवारी 2025 ला भूगोल दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाबद्दलची भीती दूर करणे, भूगोलाचे महत्त्व समजावणे, पर्यावरण रक्षणाची जागृती निर्माण करणे हा भूगोल दिन साजरा करण्यामागचा खरा उद्देश आहे.
त्याचबरोबर भूगोलातील महर्षी समजले जाणारे प्रा. श्री सी. डी. देशपांडे यांचा जन्मदिवस भूगोल दिन म्हणून पूर्ण भारतभर साजरा करण्यात येतो. याच भूगोल दिनाचे औचित्य साधून आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील भूगोलशास्त्र विभागामार्फत व्याख्यान, वृक्षारोपण भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन, भौगोलिक पुस्तकांचे प्रदर्शन, भित्तिपत्रक सादरीकरण, फूड फेस्टिवल असे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रो.(डॉ.) एम.ए. पाटील ( श्री विजयसिंह आर्टस सायन्स कॉलेज पेठ वडगाव) तर अध्यक्ष प्रो.(डॉ) एस. आर. सरोदे मॅडम (प्रभारी प्राचार्य वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड ) यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर प्रमुख पाहुणे प्रो.(डॉ) एम.ए.पाटील सर यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर भौगोलिक पुस्तकांचे व उपकरणांचे प्रदर्शन पाहून पाककलाकृती पाहण्यात आल्या.
पृथ्वी गोलाला पुष्पहार घालून व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस.जे. सकट सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रो.(डॉ) एम. ए. पाटील सर यांनी भूगोलातील नोकरीच्या संधी व करियर या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षा प्रभारी प्राचार्य सरोदे मॅडम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या फूड फेस्टिवल मध्ये बी.ए.भाग 1 मधील अरबाज मुल्ला याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या फूड फेस्टिवल मध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कु.सायली पवार हिने प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार कु. पवन चव्हाण ( बी.ए.भाग 3 ) याने मांडले. तर सूत्रसंचालन कु. प्रीती यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे सर्व संयोजन प्रा. डॉ. एस. एम. चव्हाण व डॉ. एन. एस. देसाई मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते














