Home महाराष्ट्र जाती जातीत वैरभाव निर्माण केल्याने ‘ समर्थ भारत ‘ होऊ शकत नाही...

जाती जातीत वैरभाव निर्माण केल्याने ‘ समर्थ भारत ‘ होऊ शकत नाही : जयसिंग वाघ 

121

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.22जानेवारी):- भारतात हजारो वर्षांपासून हजारो जाती अस्तित्वात आहेत . हजारो वर्षांपासून या जाती जातीय द्वेष जोपासत आल्या आहेत . देशाच्या उभारणीत मूठभर जाती अग्रगण्य राहिल्या , या मुठभर अग्रगण्य जातींनी उर्वरित जातींना सार्वजनिक जीवनातून बाद करून टाकले , त्यांच्यावर अनन्वित अन्याय , अत्याचार केले त्यामुळे आपला देश हजारो वर्षे परकियांच्या गुलामीत खितपत पडला हा इतिहास असताना आजही जाती जातीत वैरभाव निर्माण केले जाते हा वैरभाव आम्ही नष्ट करू शकलो नाही तर समर्थ भारताची उभारणी होऊ शकणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

     शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मणियार लॉ कॉलेज तर्फे दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजित एन. एस. एस. शिबिराच्या बौद्धिक सत्रात ‘ समर्थ भारता करिता जातीअंत ‘ या विषयावर मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते .

      जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतात चार वर्णांचा वैदिक धर्म वर्णीय संघर्षात कायम राहिला व या संघर्षात त्यांनी क्षत्रिय वर्ण नष्ट करून टाकला . शूद्र वर्णाला कोणतेच स्थान दिले नाही , जवळ जवळ सर्वच वैश्य पुढं जैन झाले . वर्णीय संघर्षातून तसेच वर्णीय द्वेषातून वैदिक धर्म संपुष्टात आला . हाच वैदिक धर्म पुढं ब्राम्हणी धर्म म्हणून ओळखला गेला त्यात जाती निर्माण केल्या गेल्या , जाती व्यवस्थेत बहुतांश जातींच्या हातात शस्त्र न देणे , त्यांना शिक्षण न देणे , त्यांना उत्पादनाची साधनं न देणे त्यामुळे या जाती अन्याय सहन करण्या पलीकडं काहीच करू शकल्या नाही पर्यायाने देशाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत गेला , ब्रह्मदेश , अफगाणिस्तान , सीरिया , पाकिस्तान , बांगला देश व अन्य काही देश भारत भूमीतून बाहेर गेले , या देशाची अमाप संपत्ती परकीय आक्रमकांनी लुटली , मंदिरं उद्ध्वस्त केली व एक विकलांग भारत तयार केला तेंव्हा इतिहासातून बोध घेवून देशाचा राज्य कारभार फक्त संवैधानीक मूल्यांवर आधारित केला तर देश समर्थपणे उभा राहील .संविधानाने जातीअंत होणार नाही मात्र जाती जातीत संघर्ष होणार नाही असे वाघ यांनी स्पष्ट केले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गणपत धुमाळ होते त्यांनी आपल्या मनोगतात विविध जाती या हजारो वर्षांपासून उदयास आलेल्या आहेत . जाती जाती चे संघर्ष होत गेल्याने जाती अधिक मजबूत होत गेल्या व त्या समर्थ भारताच्या उभारणीत अडथळा ठरत गेल्या असे विचार व्यक्त केले .

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल न्हावी यांनी तर आभार प्रदर्शन प्रसेनजित निकम यांनी तर स्वागत प्रा. स्वाती लोखंडे , तुषार पाटील , विकास शेजवळे, राहुल तेली यांनी विशेष परिश्रम केले , दिलीप तासखेडकर , अशोक सैंदाणे , चंद्रशेखर अहिरराव आदींसह विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here