


✒️कवठेमहांकाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कवठेमहांकाळ(दि.21जानेवारी):-बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी राहिलेले व 2014 चे तथागतीत गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या विरोधात विधानसभा, आमदार सुमन पाटील यांच्या विरोधात 2019 ची विधानसभा आणि 2019 ची माजी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या 2024 मधील विधानसभा लढलेला कार्यकर्ता, गेले पंधरा वर्षे स्वाभिमानी प्रामाणिक काम करणारा निळ्या झेंड्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले डॉ. शंकरदादा माने यांना बहुजन समाज पार्टीचा शिलेदार म्हणून ओळखलं जात होतं, परंतु 2024 च्या विधानसभा इलेक्शन मध्ये काही वरिष्ठाकडून मदत मिळाली नसल्यामुळे नाराज होऊन डॉ.शंकर माने यांनी बहुजन समाज पार्टी ला शेवटचा जय भीम केलेला आहे.
त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यावर चर्चा केली आहे. ते म्हणत होते की, बहुजन समाज पार्टीची विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व पार्टीचे संस्थापक कांशीराम यांची हत्तीनिशन घेऊन पंधरा वर्षे काम प्रामाणिक स्वाभिमानी काम केले, परंतु वरिष्ठाकडून म्हणावी तशी साथ मिळत नाही, प्रत्येक वर्षी पार्टीला आर्थिक सहयोग करायचा परंतु इलेक्शनच्या काळामध्ये कार्यकर्ता काम करत असताना एक रुपयाही मदत न करता पार्टीच्या प्रचार प्रसार मध्ये ही कसुर केली जाते. माझ्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढत असताना वरिष्ठाकडून साधी एक सभा सुद्धा मला मिळाली नाही.
माझ्यासारखा स्वाभिमानी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आणि त्याच्याबरोबर होत असलेले अशी हेळसट मला बघवत नाही. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे “अन्याय करणे वाले से बडा गुन्हेगार अन्याय सहन करणे वाला होता है.” म्हणून आणि आपले येणारे आयुष्य आपापसात भांडणं काढत बसण्यापेक्षा दुसरा मार्ग निवडणे हा महत्त्वाचा विषय मला वाटतो. पार्टीमध्ये काम करत असताना आदरणीय कांशीराम, बहन कुमारी मायावती यांनी वारंवार दिलेले आदेश आणि सांगली जिल्हा तसेच तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेमध्ये संघटनची बांधणी करत असताना अनेक एक पक्षातील लोकांबरोबर विरोध पत्करावा लागत असतो. सत्ताधारी काही वेळे आपल्यावर खोटे गुन्हे टाकतात. सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करतात, अशा आपल्या सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना थांबवण्याचे काम पार्टीच्या वरिष्ठांनी केले पाहिजे, कार्यकर्त्यांना मदत केले पाहिजे परंतु कार्यकर्ता संकटात सापडला की त्याला वाऱ्यावर सोडले जाते. तो त्याचे आयुष्य खराब करतो या बाबी लक्षात आल्या म्हणून हा निर्णय घेत आहे. कुमारी बहन मायावती आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलन केली त्या आंदोलनामध्ये माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले.
गुन्हे दाखल झाले म्हणून पार्टीने मला कोणतीही मदत केली नाही किंवा पोलीस स्टेशनला विचारपूस केली नाही,उलट निवडणुकीमध्ये माझे तिकीट कट करण्याचा प्रयत्न करून माझ्याबरोबर अन्याय केला आहे. मला सरळ सांगण्यात आलं तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, तुम्ही निवडणूक लढू शकत नाही. पार्टीमध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे दाखल होतात मग याचा अर्थ असा तर नाही की आमची गुन्हेगारी पार्श्वभू आहे. मला तर असं म्हणायचं आहे की आम्ही विरोधकांसाठी तर गुन्हेगार आहेच परंतु आमच्या पार्टीसाठी सुद्धा ठरलो. मग आंदोलन करायचं आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा तर गुन्हे दाखल होतात. मग आम्हाला तिकीट सुद्धा देणार नाही अशी परिस्थिती असेल तर पार्टी सोडणे कधी पण बरोबर निर्णय ठरेल. मी पार्टीचा व पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांचा आभारी आहे. या लोकांनी मला गेले पंधरा वर्ष बहुजन समाज पार्टीच्या पदावर ठेवलं आणि त्या विश्वासाने आम्ही काम करत राहिलो, जास्त काही या लोकांबद्दल किंवा पार्टी बद्दल मला बोलायचं नाही परंतु एखादा नवनिर्वाचित पदाधिकारी किंवा कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याची कदर पार्टीने केली पाहिजे. पार्टीने त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे, एवढंच माझा सल्ला राहील. पार्टी ही मिशन मुव्हमेंट मध्ये काम करणारी आहे आणि पार्टीचे काम करणारा कार्यकर्ता आपलं घरदार संसार कुटुंब जाळून काम करतो, किमान तो इलेक्शनला उभारल्यानंतर त्याला पार्टीने मदत करणे अपेक्षित असते. इतर उमेदवारास तिकीट देताना तुमचा प्रोटोकॉल ठीक आहे परंतु आपले जीवन दिलेल्या कार्यकर्त्यांना तर तुम्ही मदत करणे अपेक्षित होतं ते अपेक्षा भंग झाल्यामुळे मी पार्टीचा राजीनामा देत आहे.
बहुजन समाज पार्टी व पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शेवटचा जयभीम.आपल्यासोबत उपस्थित असलेले अजित दादा खंदारे, जालिंदर मोहिते, बाळासो पाटील, शुभम चव्हाण, सिद्धनाथ माने, सुनील खोत, विशाल करपे, गौरव लोंढे, मुशाहिद पटेल, सविता माने, संजना आठवले, उज्वला धोत्रे, रेश्मा वनखडे, शबाना पटेल, नंदा यमगर, जोया वारे, सायली साठे, अर्चना मोहिते, सुषमा लोंढे, श्रद्धा आठवले, संगीता धेंडे,
प्रमिला वाघमारे यांचेसोबत चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचे डॉ. शंकरदादा माने यांनी सांगितले.














