Home महाराष्ट्र शेकडो गुंतवणूकदारांना ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुना- अधिसूचना काढल्याच्या तीन वर्षांनंतरही...

शेकडो गुंतवणूकदारांना ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुना- अधिसूचना काढल्याच्या तीन वर्षांनंतरही अंतिम कारवाईच नाही….एक महाघोटाळा

222

🔺’स्प्राऊट्स’ या मुंबईतील अत्यंत विश्वासार्ह इंग्रजी न्यूजपेपरने गुंतवणूकदारांच्या हितासाठी कायमच खंबीर भूमिका घेतलेली आहे. ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने (SIT) आतापर्यंत अनेक महाघोटाळे उघडकीस आणलेले आहेत. त्यापैकीच हा एक महाघोटाळा…

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.18जानेवारी):-मुंबईतील वादग्रस्त प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांची ५०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. त्याबाबत २०१५ साली एफआयआर झाला. त्यानंतर कंपनीच्या प्रॉपर्टीवर टाच आणण्याची अधिसूचनाही काढण्यात आली. मात्र अद्यापही अंतिम कारवाईच झाली नसल्यामुळे गुंतवणूकदारांना फुटकी कवडीही मिळेलेली नाही, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT) माहिती अधिकार कायद्यातून मिळालेल्या कागदपत्रांतून मिळालेली आहे. 

प्रकाश रसिकलाल मसालिया Prakash Rasiklal Masalia असे या कंपनीच्या संचालकांचे नाव आहे. त्याची पत्नी- दिना प्रकाश मसालिया (Dina Prakash Masalia), मुलगा- अमित प्रकाश मसालिया (Amit Prakash Masalia), सून- पायल अमित मसालिया (Payal Amit Masalia), जावई- मयंक हेमंत दोशी (Mayank Hemant Doshi) या फ्रॉड कुटुंबीयांने अथेना इन्व्हेस्टमेंट (Athena Investment) व कॉस्मो इन्व्हेस्टमेंट (Cosmo Investment) या दोन कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्या बांधकाम व्यवसायातील आहेत, त्यातून गुंतवणूकदारांना आकर्षक मोबदला देऊ, अशी जाहिरातबाजी केली व सन २०११ ते २०१५ या कालावधीत शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले व त्याचा कोणताही परतावा त्यांना दिलेला नाही. 

फसवणूक झालेल्या काही गुंतवणूकदारांनी किमान गुंतवणूक केलेले पैसा तरी परत मिळावे, यासाठी मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सुरुवातीस पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर १५ एप्रिल २०१५ रोजी भारतीय दंड संहिता (IPC) कायदा ४०६ (criminal breach of trust), ४२० (cheating), 34 (common intention) गुन्हे दाखल केले आहेत, मात्र त्याचवेळी म्हणजेच २४ जून २०१५ रोजी त्यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे. 

महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी- MPID) कायद्याच्या कलम ४ अन्वये या कंपन्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर टाच आणण्याची अधिसूचना (Notification) १३ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली व त्यानुसार ३४ बँक खाती/ समभाग यावर हंगामी टाच आणण्यात आणली, मात्र नंतर आर्थिक गुन्हे शाखा (EOW) व कायद्यांतर्गत असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी (उपजिल्हाधिकारी) त्या कारवाईला अंतिम रूपच दिले नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे जामिनावर असणाऱ्या आरोपींनी त्रयस्थ व्यक्ती / संस्थांबरोबर आपले व्यावसायिक व्यवहार सुरूच ठेवले आहेत, असेही फिर्यादीचे वकील अधिवक्ता सचिन म्हात्रे यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) मांडले आहे.  

५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा महाघोटाळा 

आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) रिपोर्टनुसार या महाघोटाळ्यात ४२ गुंतवणूकदारांची २२ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे, मात्र ‘स्प्राऊट्स’च्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात १०० हून अधिक पीडित व्यक्ती आहेत व यातील रक्कम ही ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे.   

महाघोटाळा ‘मॅनेज’ करण्यात सरकारी अधिकारी आघाडीवर

कंपनीच्या आठ आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले, मात्र ते अद्यापही जामिनावर मोकाट फिरत आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, कॉम्पटेटिव्ह ऍथॉरिटी, फॉरेन्सिक ऑडिटर यांचे वरिष्ठ अधिकारी व मंत्रालयातील प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या संगनमतामुळे या महाघोटाळा ‘मॅनेज’ करण्यात आलेला आहे, अशी माहिती स्प्राऊट्सला त्यांच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. 

कोर्टातही कागदपत्रे सादर नाहीत 

फॉरेन्सिक रिपोर्टही अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, इतकेच नव्हे तर ७ पैकी २ आरोपींनी अद्याप त्यांच्या संपत्ती व देणी (assets and liabelities) यांचा तपशीलही कोर्टाला सादर केलेला नाही.

ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांचे तळतळाट लागणार! 

बहुतांशी पीडित गुंतवणूकदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे असंख्य तळतळात हे लाचखोर अधिकारी व आरोपी यांना भोगावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रियाही काही गुंतवणूकदारांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here