Home महाराष्ट्र लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या वतीने उद्योजकांचा सन्मान

लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या वतीने उद्योजकांचा सन्मान

148

 

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी, मो 86985 66515

 

 

व्यापाऱ्यांसाठी सर्व कर प्रणाली प्रशिक्षण शिबिर संपन्न

 

 

गंगाखेड :-लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी,टॅक्स असोसिएशन परभणी व एक्सल टॅली पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर अनुपालन व गंगाखेड येथील उद्योजकांचा पुरस्कार वितरण सोहळा (दि.12 जानेवारी रविवार) रोजी सायंकाळी गंगाखेड येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास जीएसटी कमिशनर धनंजय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. शहरातील लहान मोठे सर्व व्यापारी बांधवासाठी एक्सल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे, लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी व टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 जानेवारी रवीवार रोजी शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे सायंकाळी 4 ते 7 या दरम्यान व्यापाऱ्यांसाठी टॅली जीएसटी इन्कम टॅक्स याविषयीचे सेमिनार व गंगाखेड शहरातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
या सेमिनारास सीए श्याम धूत, सीए अरुणकुमार ओझा, सीए कुशल गंगवाल, संपत पाठक, सुमित सिंह, संतोष सांगळे या मान्यवरानी व्यापाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये लघु, मध्यम उद्योग व्यवसायाची व्यवस्थापन प्रदर्शित करणारी कर प्रणाली, अनुपालन या विषयी योग्य दिशा योग्य दृष्टिकोन सर्व व्यापारी बांधवांना तसेच शासनाकडून लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य घेण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय वाढीसाठी, शासनाकडून मिळणारी सबसिडी या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात गंगाखेड तालुका व शहरातील व्यापारी बांधवांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास शहरातील लहान मोठे व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. प्रा. विष्णू मुरकुटे यांनी केले तर आभार लॉ. संजय सुपेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीचे अध्यक्ष लॉ. जगदीशजी तोतला, कैबिनेट ऑफिसर डॉ. संजय सुपेकर, एक्सल इन्फोचे संचालक संपत पाठक, निलेश बंग, कर सल्लागार असोसिएशनचे उपाध्यक्ष गोविंद भंडारी, कर सल्लागार पुरुषोत्तम भंडारी यांच्यासह लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
—-
*प्रथमच गंगाखेड शहरातील करदात्या व्यापाऱ्यांचा व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला*

सन्मानीत व्यापारी व उद्योजक यांच्या आर्थिक लेखाजोखा करणाऱ्या लेखा परीक्षक यांच्या समक्ष गौरव करण्यात आला व आयटी रिटर्न जीएसटीकर प्रणाली इत्यादी करावर मोलाचं मार्गदर्शन व सत्कार जीएसटी आयुक्त धनंजय देशमुख, अँड.सुभाष इंगळें, प्रदीप काबरा, अँड.भारत कराळे, राजकुमार भांबरे,संदीप भंडे,सत्यम गुंडलवार ,विजय मुंदडा यांनी केले. सत्कारमूर्ती व्यापारी व उद्योजक -राधेशाम भंडारी,किसन गोयल, पवन दायमा, बाबासाहेब धुळे, रोहित गंगवाल, शैलेश अग्रवाल, दीपक फड, ऋषिकेश चौधरी, अजय बंग, राहुल आया, अंबादास राठोड, राहुल चव्हाण, मनीष मानधना, रामेश्वर टवानी, मोहित तापडिया, हरीप्रसाद सोनी, अंगद बंगाळ,डॉ.संजय सुपेकर यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here