


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.11जानेवारी):-शहरातील लहान मोठे सर्व व्यापारी बांधवासाठी एक्सल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे, लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी व टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (दि.12 जानेवारी रवीवार) रोजी शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे सायंकाळी 4 ते 7 या दरम्यान व्यापाऱ्यांसाठी टॅली जीएसटी इन्कम टॅक्स याविषयीचे सेमिनार व गंगाखेड शहरातील उद्योजकांचा सत्कार आयोजित करण्यात आले आहे.
या सेमिनारास सीए श्याम धूत, सीए अरुणकुमार ओझा, सीए कुशल गंगवाल, संपत पाठक, सुमित सिंह, संतोष सांगळे हे मान्यवर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सेमिनारमध्ये लघु मध्यम उद्योग व्यवसायाची व्यवस्थापन प्रदर्शित करणारी कर अनुपालन या विषयी योग्य दिशा योग्य दृष्टिकोन सर्व व्यापारी बांधवांना तसेच शासनाकडून लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य घेण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय वाढीसाठी, शासनाकडून मिळणारी सबसिडी या विषयावर उपयुक्त ठरणार आहे.
तरी गंगाखेड तालुका व शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपला बहुमूल्य वेळ काढूण या एक दिवसीय सेमिनारास उपस्थित राहून जीएसटी टॅक्स व टॅली या संदर्भात मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीचे अध्यक्ष लॉ.जगदीश तोतला, एक्सल इन्फोचे संचालक संपत पाठक,कर सल्लागार असोसिएशनचे उपाध्यक्ष गोविंद भंडारी, कर सल्लागार पुरुषोत्तम भंडारी यांच्यावतीने करण्यात आले आहे














