Home महाराष्ट्र कळमगाव (गन्ना) येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान: ग्रामसफाई, रामधून

कळमगाव (गन्ना) येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान: ग्रामसफाई, रामधून

139

✒️सिंदेवाही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सिंदेवाही(दि.9जानेवारी):-तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त ग्रामवासियांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसफाई, घटस्थापना आणि सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी त्यांच्या ‘गाव हा विश्वाचा नकाशा ‘ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केवलराम गेडाम यांनी प्रास्ताविकातून आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.

प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने प्रचारक काशिनाथ बावणे, नामदेव पाकमोडे , रवींद्र पाकमोडे, मुरलीधर कुळमेथे यांना ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विलासराव चौधरी (पेंढरी), तुळशीदास गेडाम, सुरेश निकुरे ,दादाजी बारेकर, बाबुरावजी गेडाम विचारपिठांवर उपस्थित होते. ‘ गाव हा विश्वाचा नकाशा’ या व्याख्यानाचे पुष्प गुंफतांना बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर विशेष भर दिला. ते म्हणाले ,ग्राम संस्कृतीचे नितळ रूप ग्रामगीतेत दिसून येते.

भारत हा खेड्यांचा देश असल्याने राष्ट्रसंतांनी डोळ्यापुढे गाव ठेवला आणि गाव हे शहरासाठी पूरक असून कृषी मालावर आधारित लघुउद्योग, स्वयंरोजगार गावागावात सुरू झाल्यास गाव खेडी समृद्धीकडे वाटचाल करू शकेल. गाव स्वच्छ- निरोगी होण्यासाठी गावातील प्रत्येक घर आदर्श करावे लागेल. करिता ग्रामगीतेतील ग्रामोदयाचा विचार प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. गावात परस्पर स्नेहभाव वाढला पाहिजे आणि ग्राम नवनिर्माणासाठी सामूहिक हात पुढे आले पाहिजे . तेव्हाच ग्राम सुधारण्याच्या कार्यास दिशा प्राप्त होईल . ग्रामगीता ही ग्रामविकासाची संहिता आहे , त्यामुळे ती गावाच्या भिंतीवर लिहिली जावी आणि घरोघरी वाचली जावी अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भजनाचा कार्यक्रम झाला. यात विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ विसापूर, गुरुदेव सेवा भजन मंडळ कुकडहेटी, गुरुदेव भजन मंडळ चारगाव , श्री गुरुदेव भजन मंडळ कोठा , श्री गुरुदेव भजन मंडळ पांगडी , श्री गुरुदेव भजन मंडळ चक ब्राह्मणी , माल ब्राह्मणी आणि श्री गुरुदेव महिला भजन मंडळ कळमगाव इत्यादींनी आपापली भजने प्रस्तुत केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी जीवनास भरडे यांनी सामूहिक ध्यानावर चिंतन प्रस्तुत केले. शोभायात्रा , रामधून काढण्यात आली. समारोपिय कार्यक्रमात पं.स. चे माजी उपसभापती बाबुरावजी गेडाम, प्रचारक विलास चौधरी (पेंढरी ), सितकुरा बारेकर, श्रीहरी जांभुळे, सरपंच सौ.मालताताई अगडे, उपसरपंच अविनाश नन्नावरे, पोलीस पाटील सौ. अल्काताई चौधरी , राजू सरपाते, ग्रामपंचायत सदस्य दिगांबर भंडारे , अंबादास मगरे,सौ. शीलाताई मेश्राम , सौ दीक्षाताई नन्नावरे ,सौ.रेखाताई चौधरी आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. गोपाल काल्याचे समारोपीय कीर्तन बाबुरावजी गेडाम यांनी केले . या कार्यक्रमासाठी रवींद्र पाकमोडे, मधुकर पाकमोडे ,उत्तम नन्नावरे, गेंदबाजी खोब्रागडे ,धनपाल नन्नावरे, अशोक रामटेके, तुकडू नन्नावरे ,राजेंद्र बारेकर, राजेंद्र जांभुळे, सुभाष श्रीरामे, डॉ. श्याम चौधरी, बळीरामजी ठिकरे, श्रावण मगरे ,संजय ठिकरे,दशरथ मडावी, वामन मगरे, कवडू नन्नावरे ,तुळशीदास अगडे, नीलकंठ अगडे, शामराव चौधरी ,दादाजी बारेकर, राजेंद्र मगरे, सचिन गणवीर, दिवाकर शेंडे ,विलास मगरे, दादाजी कामडी, एकनाथ रणदिवे, रवींद्र मेश्राम ,श्रीहरी चौधरी, शालिक मगरे ,एकनाथ निकुरे, प्रदीप मगरे, दिगंबर गेडाम, चरणदास कुंभरे, प्रभाकर श्रीरामे , मंगलदास उईके , रायभान मेश्राम , ढेकलू गेडाम, सुखदेव मगरे, नामदेव सावसाकडे, दिवाकर तासलवार ,महादेव पाकमोडे, सुखदेव नन्नावरे, कैलास तासलवार , प्रकाश मगरे, अशोक नन्नावरे ,सुरेश कुळमेथे, विजय अलोने ,प्रभाकर शेंडे ,दिनेश शेंडे, महेश मडावी, जनार्धन मेश्राम ,युवराज नन्नावरे, कैलास कस्तुरे, बंडू नन्नावरे, वृंदन कन्नाके, निखिल मगरे, बबलू शेख, महेश वैद्य, दिवाकर मडावी, विलास मडावी तसेच सेवा मंडळाचे शाखाध्यक्ष नामदेव पाकमोडे, उपाध्यक्ष सुरेश निकुरे, सचिव दादाजी बारेकर, काशिनाथ बावणे, सुरेश गायकवाड ,कार्तिक मगरे, अरुण सत्येकर ,पुरुषोत्तम चौधरी, मारुती गेडाम, खुशाल गेडाम, नथुजी कन्नाके, मुरलीधर कुळमेथे, कृष्णा भंडारे, उष्टु मेश्राम, मारोती निकुरे , मनोहर मगरे, खुशाल मगरे, विलास भरडे, दिवाकर सोनुले ,जगन कस्तुरे, कृष्णा मडावी, मालुबाई नन्नावरे, आशाताई गेडाम, सिंधुताई बगडे, शीलाबाई नन्नावरे , सुरंजना नन्नावरे , धनश्री शिंदेकार, सिमरन गेडाम, खुशी मेश्राम ,दुर्गा गेडाम, स्वरा नन्नावरे, सारिका कस्तुरे, आशाबाई गेडाम आदी गुरुदेव सेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here