


▪️सिरपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8208946716
चिमुर(दि.7जानेवारी):-स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, बालविवाह, सती प्रथा तथा सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता आदी बाबींवर विशेष भर दिला. त्यांच्या या कार्यामुळे आजची महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारीत भेदभाव आणि अन्यायकारक वागणुक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबविण्यासाठी प्रयत्न केला. सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षणासाठी अनमोल योगदान आहे असे प्रतिपादन मेंडकीच्या माळी समाज सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई शेंडे यांनी व्यक्त केले. त्या माळी समाज सिरपूरच्या वतीने आयोजीत सावित्रीबाई फुले जयंती निमित्य अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ब्रम्हपुरीच्या माळी समाज सामाजिक कार्यकर्त्या डॉ. पल्लवीताई मोहुर्ले प्रमुख पाहुणे म्हणुन माळी समाज जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विनोद निकुरे, अर्जुनी (मोरगांव) चे प्रा. डॉ. ईश्वर मोहुर्ले, ग्रा. पं. सिरपुरचे सदस्य जयपाल गावतूरे, पोलीस पाटील मंगेश भानारकर, सेवानिवृत्त पोलीस तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ईश्वर लेनगुरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष भुनेश्वर गावतूरे, उपाध्यक्ष विनोद निकोडे, माळी समाज सिरपूरचे अध्यक्ष जयपाल गुरनुले, प्रतिष्ठीत नागरिक डॉ. रामकृष्ण सोनुले, माजी सरपंच पार्वता आदे, अंगणवाडी सेविका कल्पना गावतूरे आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सलोनी निकोडे, प्रास्ताविक स्वराज निकोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार माळी समाज सिरपूरचे सचिव विशाल गावतूरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता माळी समाज सिरपूरचे मनोज मोहुर्ले, यशवंत निकोडे, देवराव गावतूरे, जयेंद्र गुरनुले, राजकुमार गावतूरे, सुनिल गावतूरे, अमोल मोहुर्ले, मंगेश निकोडे, जीवन गावतूरे आदीने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला माळी समाज महिला – पुरुष तथा गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.














