Home महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कार्यक्रम संपन्न

310

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.2जानेवारी):- दिनांक 02/01/2025 ला महाराष्ट्र पोलीस स्थापना रीजनिंग डे दिवस निमित्त जिल्हा परिषद माजी माध्यमिक विद्यालय ब्रह्मपुरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक कोमल घाडगे मॅडम ,पोलीस हवालदार अरुण पिसे यांनी लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ,तसेच अल्पवयीन मुलं मुली पळून जातात याविषयी त्यांनी शिक्षणाच्या वयामध्ये शिक्षण घ्यायलाच पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केलं, तसेच स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आला.

पोलिसांच्या दैनंदिन जीवनामध्ये पोलिसांचे कर्तव्य का असतात तसेच पोलीस स्टेशनच्या कामकाज कशा पद्धतीने चालतो ,याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आला ,या कार्यक्रमाची वेळी शाळेचे मुख्याध्यापक रामटेके सर ,सर्व शिक्षक 125 मुल मुली हे हजर होते कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू करून चार वाजता संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here