


अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड:- गंगाखेड विधान सभेमध्ये यावेळी वंचित मुळे गणीत बिघडण्याची शक्यता दिसत आहे. गंगाखेड विधानसभा मध्ये महाविकास आघाडी व इतर उमेदवार यांच्यात नाकेनाऊ अनले आहे. सद्या है उमेदवार हैरान झाल्याची चर्चा जनते मधे सुरु आहे. ज्या मुळे लोकसभेच्या आघाडीचे गणित विधानसभेमध्ये बिघडण्याची शक्यता आहे यावेळी वंचित मुळे गणित बिघडण्याची चर्चा जनतेमध्ये जोरात सुरू आहे. वंचित चे उमेदवार माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) यांच्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होताना दिसत आहे या मतदारसंघात वंचित ची चौफेर घुसकोरी करताना दिसते अशी जनतेमध्ये गावोगावी चावडीवर शहरात चर्चा सुरु झाली आहे. यामुळे आघाडी व महायुतीचे उमेदवार दमछाक होताना चर्चा जनतेत आहे .वंचित कडून ऐनवेळी माजी आमदार सिताराम घनदाट (मामा)आल्या मुळे गंगाखेड विधानसभा मध्ये लढत रांगदर होताना दिसते. गंगाखेड विधानसभे मधे वंचीत किती प्रभावी ठरेल हे येणारा काळात दिसेल. शिवाय गंगाखेड मतदार संघात चौरंगी लढत होताना दिसत आहे.














