


नाशिक प्रतिनिधी -शांताराम दुनबळे
नाशिक – आदीवाशी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इगतपुरी आज आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था एक अनोखी नाव होय जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून इगतपुरी तीनलकडी ते नवीन तहसीलदार कार्यालय इगतपुरी पायी रॅली काढण्यात आली.
त्यानंतर तहसील कार्यालय येथे शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
इगतपुरी तालुका आदिवासी बहुल असूनही तेथील आदिवासी समाज अद्यापही शासकीय योजनांच्या लाभपासून वंचित आहेत. या मधील प्रामुख्याने सामान्य कुटुंबासाठी असलेली शिधापत्रिकापासून अद्यापही बरीचशी कुटुंबे यापासून वंचित आहेत.
म्हणुन नारिशक्ती संस्थेच्या सभासद व अध्यक्षा निता वारघडे यांनी तालुक्याचे कर्तव्यक्ष तहसीलदार अभिजित बारवकर आणि नायब तहसीलदार अनिल मालुंजकर, पुरवठा विभाग प्रमुख शमयूर बागुल,श्री.दशरथ जाधव, एस. आय.गोसावी, श्री.बागुल
यांच्या उपस्थितीत व सहकार्याने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबियांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
सदर शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. शालू बबन हंबीर, सचिव सौ.शकुंतला मोहन ठाकरे, खजिनदार श्री.संगीता आवली, सौ.जया संतोष भगत, सौ.मंजुळा सराई, सौ.सुनिता डोके, सौ.ज्योती डोके व सोनी दोरे
सामाजिक कार्यकर्ते संतोष भगत, बबन हंबीर, बाळू गावंडा या सर्वांच्या सहकार्याने शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.














