Home चंद्रपूर सुधीर करंडे यांनी 45 व्या वाढदिवसानिमित्य घेतला देहदानाचा निर्णय-आप्तेष्टांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुधीर करंडे यांनी 45 व्या वाढदिवसानिमित्य घेतला देहदानाचा निर्णय-आप्तेष्टांकडून शुभेच्छांचा वर्षाव

886

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- अनेक लोक आपला वाढदिवस आला की, वाढदिवसाच्या दिवशी हजारो रुपयाची उधळण करतात. तर काही गोर गरिबांना मदत करून काही होतकरू गरीब शाळकरी लहान मुलांना मदत करून आपला वाढदिवस साजरा करतात. तर काही आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करताना दिसतात मात्र थोर संत महापुरुषांना आदर्शवत ठेऊन जिवंत पणी आणि मेल्यानंतरही आपला देह लोकांना उपयोगी पडावा. डॉक्टरांना आपल्या देहाचा अभ्यास करून नवनवीन संशोधन करावे. मृत्यूपश्चात देहावर होणारे कर्मकांड यांना फाटा देऊन आपले अवयव -कोणाच्या न कोणाच्या कामात लागावा.

देव दगडात नाही तर माणसात आहे असे संत गाडगे महाराज म्हणायचे. जिवंतपणीच आपणं समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनाशी बांधून चांगले कार्य केले आणि आपण लोकांच्या उपयोगी पडलो तर अनेकांचे कल्याण होईल अशी भावना उराशी बाळगून आणि येणाऱ्या पिढीला देहदानाचे महत्वकळावे यासाठी लागावा म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील सुधीर रमेश करंडे (45); यांनी आपल्या 45 व्या वाढदिवशी देह दानाचा निर्णय घेतला.ते सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांनी समाजाप्रती काही देणं लागते ही जाणीव मनात बाळगून देहदान करावं असे त्यांना नेहमीच वाटत असे अखेर त्यांनी आपल्या देहदनाच्या निर्णय घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण केले आहे त्यांच्या या निर्णयाने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here