Home गडचिरोली नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवजी किरसान यांनी गाजवली आढावा बैठक-प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे...

नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवजी किरसान यांनी गाजवली आढावा बैठक-प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे दिले निर्देश

504

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430

चिमूर : – गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवजी किरसान यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील राजीव गांधी सभागृह याठिकाणी दिनांक.०५/०७/२०२४ वेळ दुपारी १२:०० वाजता चिमुर तालुक्यातील विविध समस्यांवर आढावा बैठक संपुर्ण शासकिय यंत्रणेला आमंत्रित करून घेण्यात आली. यावेळी इंदिरा नगर येथील वसलेल्या वस्तीतील नागरिकांना पक्के पट्टे देण्यात यावे यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना विविध निवेदने देऊन सुद्धा हि बाब कित्तेक वर्षांपासून प्रलंबित असून यावर तात्काळ मार्ग काढून जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे.असेही खडेबोल मुख्याधिकारी यांना खासदारांनी सुनावले व इतर रास्त जनतेच्या समस्या सुद्धा तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात आणि ईतर तालुक्यात सर्व प्रशासकिय कर्मचाऱ्यांना सुद्धा आव्हान करण्यात आले कि जनतेच्या समस्यांचे प्रश्न योग्य त्या पद्धतीने मार्गी लावावे अशाही सूचना उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष दिल्या गेल्या.यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा खनिकर्म अध्यक्ष डॉ. अविनाश वारजूकर , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चिमूर -७४ विधानसभा क्षेत्राचे समनव्यक डॉ.सतीश वारजूकर , माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके ,तालुका अध्यक्ष विजय गावंडे , तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी , प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी ओबीसी विभाग धनराज मुंगले , प्रशांत कोल्हे शिवसेना उपजिल्हा प्रमुख ( उबाटा ) , नवनियुक्त स्वीय साहाय्यक राजेश चौधरी , व अन्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here