Home महाराष्ट्र शासकीय/ निमशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे छायाचिञ लावा

शासकीय/ निमशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे छायाचिञ लावा

430

चिमूर ( प्रतिनिधी)
शासकीय/ निमशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचिञ लावण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक विकाक—२०१६/प्र.क्र.५१/२९ दि.१२ जुलॆ २०१६ चे आदेश आहेत,या आदेशानुसार लोकांची मागणी आल्यास तेथील शासकीय/ निमशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचिञ लावायचे आहे.परंतू हा आदेश निघून ८ वर्षे झाले तरी अजुनपर्यंत योग्य कार्यवाही झालेली नाही असे मत प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरूजी यांनी व्यक्त केलेले आहे.
शासनाच्या आदेशावर योग्य कार्यवाही व अमंलबजावणी होत नाही.जनतेकडून प्रत्येकवेळी शासकीय/ निमशासकीय कार्यालयास निवेदन देण्याची गरज नाही हे आदेश महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,आयुक्त महानगरपालिका,विभागीय आयुक्त,माहिती व जनसंपर्क विभाग यांचेकडे आहेत.परंतू याकडे दुर्लक्ष होत आहे.प्रत्येक जिल्ह्यातील गुरूदेवप्रेमी मंडळींनी स्थानिक स्तरावर अधिकार्यांना निवेदने देवून शासकीय/ निमशासकीय कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचिञ लावण्याची मागणीच करावी व आपल्या गावातील सर्व कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचिञ लावावे.यामध्ये शाळा,महाविद्यालये,सरकारी व निमसरकारी सर्व कार्यालयाचा समावेश असावा असे आवाहन राजेंद्र मोहितकर चिमूर यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here