Home महाराष्ट्र दलित महासंघाच्या “संसद मंडळा”ची बैठक रविवारी कराडमध्ये होणार

दलित महासंघाच्या “संसद मंडळा”ची बैठक रविवारी कराडमध्ये होणार

426

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड : दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच संसद मंडळाच्या बैठकीचे आयोजन कराड येथे करण्यात आले आहे. देशातील राजकारण, त्याचबरोबर मातंग समाज आणि इतर तत्सम दलित आदिवासी, भटके – विमुक्त जाती जमातीं वर होणारे अन्याय अत्याचार, तसेच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न, अनुसूचित जाती आरक्षण प्रश्न, त्याचबरोबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने कराड येथे रविवार, दिनांक 23 जून 2024 रोजी दुपारी ठीक 2.00 वाजता, हॉटेल संगम, येथे संसद मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील आणि बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट हे उपस्थित राहणार आहेत. तरी,दलित महासंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सदर बैठकीस वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here