Home चंद्रपूर शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

181

 

चंद्रपूर, दि. 15 : सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए. ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 24, 25 व 26 मे 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत भवानजीभाई हायस्कूल, मुलरोड, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

ज्या परिक्षार्थिंनी सदर परिक्षेकरीता अर्ज केले आहेत, अशा परिक्षार्थ्यांनी आपले ओळखपत्र युजर आयडी वरुन काढून घ्यावे व ज्या परिक्षार्थ्यांचे ओळखपत्र मिळाले नाहीत अशा परिक्षार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, वाहन परवाना, कार्यालयाचे ओळखपत्र यापैकी एक दाखवून प्रोव्हीजन ओळखपत्र या कार्यालयाकडून 23 मे 2024 पर्यंत बनवून घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here