Home यवतमाळ जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

219

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 1 एप्रिल) सतत आंदोलनाचा पवित्रा घेत सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास होऊन शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे करीत उपविभागिय अधिकारी उमरखेड यांच्या आदेशानुसार जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख यांना पोलीस प्रशासनाने 3 महिन्यांसाठी यवतमाळ जिल्हयातून तडीपारीची नोटीस बजावली आहे.

कमी वेळात आपले राजकिय प्रस्थ निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन शासनाची परवानगी न घेता आंदोलने करून गुन्हे करीत प्रसंगी अरेरावीची भाषा वापरत लोकांना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष असल्याच्या धमक्या देऊन सतत आंदोलनाचा पवित्रा घेत असल्यामुळे सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास होत असल्याने सदर महिलेच्या कृत्यामुळे शहराची सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती सरोज देशमुख यांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 59 नुसार जाब देणारास त्यांच्या विरुद्ध आदेश देण्यापूर्वी उपविभागिय अधिकारी कार्यालयात दि. 21 डिसेंबर 2023 रोजी आदेश देण्यात आले होते.

यामध्ये सुनावणी 19 जातेवारी 2024 व 14 मार्च 2023 या कालावधीत पुढील तारखेची मागणी करून गैरहजर राहिल्या.

त्यामुळे उमरखेड पोलीसांनी शिफारस केल्यानुसार जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा यांचे विरुद्ध यवतमाळ वाशिम नांदेड या जिल्हयामधून तडीपार करण्याचा प्रस्तावित आदेश उमरखेड उपविभागिय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केला होता.

त्या अनुषंगाने अंतीम आदेशानुसार त्यांना 3 महिन्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार संजय सोळंके यांनी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here