Home Breaking News राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव महानगर जिल्हा सरचिटणीस पदी यश चांगरे यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव महानगर जिल्हा सरचिटणीस पदी यश चांगरे यांची निवड

226

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव: जळगांव येथील सरदार वल्लभभाई पटेल हाॅल येथे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगांव शहर महानगर जिल्हा सरचिटणीस पदी कामगार नेते तथा, दलितमित्र दिवंगत अरुणभाई चांगरे यांचे नातु तसेच सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चांगरे यांचे सुपुत्र, यश जितेंद्र चांगरे यांची नियुक्ती करण्यात आली असुन ना. अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सदरील नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या आदेशाने करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महानगर जिल्हाध्यक्ष सुशिलकुमार शिंदे, जितेंद्र अरुण चांगरे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here