Home Breaking News बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.परमेश्वर गोणारे यांचे गंगाखेड्यात जंगी स्वागत.

बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.परमेश्वर गोणारे यांचे गंगाखेड्यात जंगी स्वागत.

131

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.परमेश्वर गोणारे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दि.14मार्च रोजी नांदेडहुन मुंबईला जात असताना परळी नाका गंगाखेड येथे फटाक्याच्या आतिषबाजीत बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष मा.प्रसंजीत मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी गंगाखेड विधानसभा अध्यक्ष मा.संतोष हणवते यांनी प्रदेशाध्यक्ष एड.परमेश्वर गोणारे यांचे मोठ्या पुष्प हारणे स्वागत करत परळी नाका परिसर दनानून सोडला.बहुजन समाज पार्टीच्या उद्घोषणा देत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.गोणारे यांना मुंबईकडे जाण्यासाठी समारोप देण्यात आला.बहुजन समाज पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते मा.वसंतराव रायभोळे,जेष्ठ युवा नेते मा.शिवराज पैठणे,दामोदर जोंधळे,सुरेशचंद्र शिंदे,रवींद्र गायकवाड,प्रभाकर गायकवाड,सुरेश उबाळे,प्रमोद सरवदे,सचिन गायकवाड,वसंत कांबळे,अलंकार डाके,गोविंद मुंढे,पंकज मोरे आदी कार्यकर्ते सोबतच पत्रकारांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here