


सिध्दार्थ दिवेकर
(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. 13 मार्च) तालुक्यातील सुकळी (ज) या ग्रामपंचायतच्या भाजपा सोबत निवडून आलेल्या सरपंचा सौ प्रणाली मस्के यांनी “हमारी भुल कमल का फुल” असे म्हणत भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस नेते गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज संध्याकाळी कॉग्रेसच्या शहर कार्यालयात सहकाऱ्यांसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.सदर प्रवेशावेळी सुकळी येथील संरपंच यांचे सहकारी रवी मस्के , दशरथ मस्के , केदारनाथ वानखेडे , नबीउल्का जागीरदार , सुनील राठोड , अरविंद बडेराव, नुरु जाहगिरदार , राजु वानखेडे , सुरज वानखेडे, शेख निसार, शेख सुलतान , शे करीम , सूर्यभान वानखेडे , गजानन वानखेडे , लक्ष्मण वानखेडे, शेख गफार , शेख अजगर, कैलास बडेराव , फशुउद्दीन काजी आदींनी काँग्रेस मध्ये रीतसर प्रवेश घेतला.यावेळी सुकळी येथील प्रमुख उपस्थिती म्हणून बशीर भाई , ॲड ज्ञानेश्वर कनवाळे , संतोष वानखेडे , राहुल वानखेडे , डॉ आयुब पठाण आदि उपस्थित होते.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष ईश्वर गोस्वामी , भय्या पवार, सिधू जगताप, गणेश रावते, अक्षय गेस्मामी , दर्शन भंडारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.














