Home चंद्रपूर ट्रक ची दुचाकीला जबर धडक एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण...

ट्रक ची दुचाकीला जबर धडक एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी चिमूर नेरी मार्गावरील घटना

265

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर

चिमूर : – दिनांक.०८/०३/२०२४ ला सकाळी ०७.३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी बबन केशव घरत, वय ६० वर्षे, हे धनराज गोविंदा हनुमते यांचे सोबत मोटार सायकलने रामदेगी जवळील निमढेला गावावरून दोघेही नेरी येथे मजुरांचे पैसे देण्याकरीता जात होते. नेरी जवळील कळमगाव फाट्याजवळच नेरी कडून येणारा एक नारंगी रंगाचा आयशर कंपनीच्या ट्रक ने एका दुचाकीला भर वेगात कट मारून दुसऱ्या मोटरसायकलला विरुद्ध बाजूने नेवून पुन्हा कट मारून जोरदार धडक देवून तसेच दुचाकीला घासत सरपटत बाजूचे शेतात ट्रक घेऊन गेला. व मोटरसायकल चालक धनराज गोविंदा हनवते यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर फिर्यादी हे गंभीर जखमी झाले.अपघातातील ट्रक वाहन क्रमांक.MH40 CM 0287 व चालक नामे प्रफुल ईश्वर चौखे वय २५ वर्ष राहणार नवरगाव तालुका शिंदेवाही याला ताब्यात घेण्यात आले.तर जखमी प्रशांत कवडूजी बुरडकर वय ४५ वर्षे, राहणार हिंगणघाट व मनोहर शामराव कुंभारकर, ४६ वर्षे राहणार शिवनपायली यांना पुढील उपचाराकरीता सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here