Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये ‘आम्ही वेणूताईच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये ‘आम्ही वेणूताईच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन

187

 

कराड : (दि. ७, प्रतिनिधी) वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे महिला कल्याण व अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘आम्ही वेणूताईच्या लेकी’ या उपक्रमांतर्गत माजी यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार व व्याख्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. महेंद्र खैरनार होते. त्यांनी ‘महिला विषयक कायदे’ या विषयावर आपले व्याख्यान दिले. त्यामध्ये १९१५ पासून महिलांच्या हक्क व अधिकार या विषयीच्या चळवळीचा इतिहास मांडला. तसेच भारतात अनुसूची 15 अंतर्गत येणारे कायदे आणि आयपीसी अंतर्गत येणारे कौटुंबिक हिंसाचार विषयक कायदे त्यामध्ये 354, 326, पोक्सो कायदा याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व सध्या ओरोस येथे एपीआय पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती पुजा हिरेमठ यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, महाविद्यालयाने विद्यार्थी दशेमध्ये आमच्यावर ज्या अभ्यासाचे चांगले संस्कार केले त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले तसेच कॉलेजमधील मुलांनी मोबाईलचा अतिरेक टाळून अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊन जीवनामध्ये लवकरात लवकर यशस्वी व्हावे याबद्दलचा सल्ला दिला. मुलींनी आधुनिक जीवनशैलीच्या आहारी न जाता आपले जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विविध क्षेत्रांमध्ये काम करत असणाऱ्या यशस्वी माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पूजा बक्षी-हिरेमठ (API), प्रा. श्रीमती स्मिता पाटील (प्राध्यापिका व राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग खेळाडू,उंडाळे), दिपाली आशानिवास (संविधान प्रचारक व संविधान प्रचारक ) श्रीमती मानसी शिंदे (तलाठी), श्रीमती उज्वला साळुंखे (सरपंच, अंतवडी), प्रा. श्रीमती राधा गोसावी- कुलकर्णी (कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर), यांचा तसेच महाविद्यालयातील महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य प्रा. (डॉ.) श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले. त्यांनी महिलांमधील सर्जनशील क्षमतेचा गौरव केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. श्रीमती एस. पी. पाटील यांनी केली. आभार प्रा. श्रीमती एम. एम. चव्हाण यांनी केले. व सूत्रसंचालन प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here