Home महाराष्ट्र पी जी माळी यांच्या कडुन मराठी भाषा दिनी लेखन संग्रह शाळेला भेट...

पी जी माळी यांच्या कडुन मराठी भाषा दिनी लेखन संग्रह शाळेला भेट !… पी जी काकांचे कार्य ऊर्जादायी – गोपाल महाजन ( ग्रंथपाल )

212

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – २७ फेब्रुवारी, २०२४ मंगळवार रोजी वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे धरणगाव येथील लहान माळीवाडा परिसरातील रहिवासी पी जी माळी ( ह.मु.कल्याण ) यांच्याकडून सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या ग्रंथालयाला मराठी भाषा दिनी अनमोल ग्रंथसंपदा तसेच विविध सामाजिक – शैक्षणिक – आरोग्य विषयक कात्रणांचे लेखन संग्रह ९ ते १३ संच भेट देण्यात आले.
पी जी माळी काका यांचे वय वर्ष ८५ असून देखील सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रात ते अग्रेसर आहेत दरवर्षी शाळेला नवनवीन लेख, कात्रण, अनमोल ग्रंथसंपदा ते शाळेला भेट देत असतात ८५ वर्षाचे असून देखील त्यांची ऊर्जा तरुणांना लाजवणारी आहे. असे प्रतिपादन शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी केले. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी कल्याणहून ही ग्रंथसंपदा शाळेला भेट दिली.
शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व सर्व शिक्षक वृंद व ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी ही अनमोल ग्रंथसंपदा भेट स्वीकारली. आमच्या शिक्षकांना व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ही ग्रंथसंपदा प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी केले व पी.जी.माळी काकांचे भ्रमणध्वनीवरून आभार देखील मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here