Home यवतमाळ नवलबाबा वार्ड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या फलकाचे अनावरण

नवलबाबा वार्ड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या फलकाचे अनावरण

240

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

 

पुसद- दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळच्या अंतर्गत तालुका शाखा पुसदच्या विद्यमानाने आतापर्यंत शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या ४ महिला वार्ड शाखा स्थापन करण्यात आल्या असून दि.११डिसेंबर २०२३रोजी न्यु पंचशील बुध्दविहार नवलबाबा वार्ड येथे भारतीय बौद्ध महासभा महिला वार्ड शाखा कार्यकारणी गटित करण्यात आली असून शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वार्ड शाखाध्यक्ष ज्योती चोपडे, उद्घाघाटक शहराध्यक्ष ल.पु.कांबळे, मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका ज्योती कुंटे नांदेड तर प्रमुख आतिथी प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, अधिक्षक डॉ .बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह विजय बहादूरे, प्रल्हाद खडसे,रंगराव बनसोड,विनोद कांबळे,राजु पारसकर, बळीराम चोपडे, गजानन इंगोले, विशाल चोपडे हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यकारणीत अध्यक्ष ज्योती चोपडे, उपाध्यक्ष सुशीला पाईकराव, सरचिटणीस कमल पाईकराव, कोषाध्यक्ष माया इंगोले, सहसचिव सत्यभामा खडसे , तर सदस्य धुरपता हाडसे, कांता मनवर ,लिलाबाई चोपडे ,गौकर्णा मनवर, छाया गोरे, रेणुका शिंदे, एकता धुळधुळे, उषा इंगोले,रविना बहादूरे, ताई गायकवाड ,शांता चोपडे, रेखा खिल्लारे ,सूर्यकांता खंदारे म्हणून निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य भोलेनाथ कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम चौरे यांनी केले तर आभार कमल पाईकराव यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here