Home यवतमाळ भैय्यासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

भैय्यासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

185

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद-दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्या वतीने चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या १११व्या जयंती निमित्त पारमिता बुध्दविहार महाविरनगर येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत कांबळे तालुकाध्यक्ष माजी सैनिक ,उद्घाटक डॉ. अतुल रुणवाल अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय पुसद, प्रमुख पाहुणे डॉ. जय नाईक तालुका वैद्यकीय अधिकारी पुसद,भोलेनाथ कांबळे माजी जि.प.सद, देवेंद्र खडसे माजी पं.स.सदस्य,ज्योती कुंठे केंद्रीय शिक्षिका नांदेड, राहुल गायकवाड समुपदेशक पुसद,बौध्दाचार्य भगवान बरडे, उपस्थित होते.

या शिबिरात रक्त गट तपासणी, सुगर तपासणी, किडनी तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली असून यामध्ये१४५ शिबिरार्थीची तपासणी करण्यात आली.
यावेळी महालॅबचे चमु जिशान शाहा, असलम खान,किरण वानखडे, यवतमाळ येथील चमु पुनम मेक्षाम,प्रणिता देवकते,प्रविण देवकते,अनु प्रजापती,सिकलसेल विभाग द्रोपदी टारफे,शुभम पदमे,उईके,रक्तदाब तपासणी विद्या गावंडे यांनी सहकार्य केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र गावंडे, देवा लोंढे,भगवान बरडे, देविदास इंगळे, भोजराज कांबळे,विनोद कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेची व समता सैनिक दलाच्या पदाधिकारी मंडळी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here