Home Breaking News शाळेसह जायकवाडीची जागा विक्रीचा डाव, गंगाखेड शहरातील प्रकार

शाळेसह जायकवाडीची जागा विक्रीचा डाव, गंगाखेड शहरातील प्रकार

164

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

 

गंगाखेड (प्रतिनिधी )
परभणी समाज कल्याण कार्यालयाच्या आशीर्वादाने गंगाखेड शहरात खुलेआम जायकवाडी वसाहतीत कागदोपत्री सुरू आसलेली सारनाथ शाळा विक्रीसह, जागा विक्री करण्याचा घाट संस्था चालकानी सुरू केल्याने जायकवाडी प्रशासनाने वेळीच जागा परत घेण्याची मागणी काँग्रेस अनुसुचित जाती तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केली आहे.

अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग 7 यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील जायकवाडी वसाहतीतील मोक्याची1500 चौरस मीटर जागा गोदावरी विकास पञक ता.शा./इवमेजा/संर्कीण/1278/दि.11.02.2002 नुसार दि.01.08.2008 रोजी नियम अटी नूसार जागा देण्यात आली पण सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळेचे संस्थाध्यक्ष यांनी बोगस कागदपञे सादर करून जागा भाडे तत्वावर घेण्यात आली. सदरील जागेचे लाखो रूपयांचे भाडे थकीत आसुन ते आज पर्यंत भरणा करण्यात आले नाही. ते तात्काळ वसुल करुन घेण्यात यावे. असे ही निवेदनात म्हटले आहे. सदरील ही बोगस शाळा मागील पंधरा वर्षांपासून केवळ कागदोपत्रीच सुरू असून या शाळेला शासनाची मान्यता नाही. शाळेचे संपूर्ण रेकॉर्ड बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून शासना सह जनतेची दिशाभूल केली जात आहे. सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा ही इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सुरू असल्याचे शासनास व जनतेस भासवले जाते, पण प्रत्यक्षात इयत्ता पहिली ते नववी वर्गात एकही विद्यार्थी आढळून येत नाही फक्त दहावी परीक्षेच्या काळात पर जिल्ह्यातील प्रौढ विद्यार्थ्यांना दहावी पासच्या हमीवर पैशाचे पॅकेज ठरवून नियमबाह्य प्रवेश दिला जातो. गटशिक्षणाधिकारी श्री. बालाजी सगट यांनी वेळोवेळी सादर केलेल्या शाळा तपासणी अहवालात शालिग्राम शिक्षण व समाज कल्याण संस्था शेळगाव अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या, सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा जायकवाडी वसाहत गंगाखेड व मागासवर्गीय प्राथमिक माध्यमिक निवासी शाळा मैराळ सावंगी ता. गंगाखेड या दोन्ही शाळा बंद असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी व एस.एस.सी. बोर्ड औरंगाबाद यांना अहवाल दिला आहे. या शिक्षण संस्थेच्या तक्रारी व वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे बोगसगिरीचे बिंग फुटल्याने संस्थाचालकाने गंगाखेड शहरातील जायकवाडी परीसरात असलेली सारनाथ प्राथमिक माध्यमिक निवासी शाळेची विक्री, जागेसह करण्याचा घाट सुरू केल्याची चर्चा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जागेचे लाखो रूपयांचे भाडे थकीत आहे. सदरील सारनाथ शिक्षण संस्थेस देण्यात आलेली जागा जायकवाडी प्रशासनाने तात्काळ थकीत भाडे वसुल करून परत घेण्याची मागणी काँग्रेस अनुसुचित जाती तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केली आहे. अन्यथा जन आंदोलनासह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here