


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 9 ऑक्टोंबर) सोयाबीनवर हळद्या (पिलीया) नावाच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
वर्ग 1 व वर्ग 2 सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000/- रुपयाची मदत जाहीर करा..!
या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने उप विभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यान मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टीभाऊ विनकरे, तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे, शाहरुख पठाण पत्रकार युवा राष्ट्रदर्शन तालुका महासचिव देवानंद पाईकराव, तातेराव हनवते (रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख), अरविंद धोंगडे (रिपब्लिकन सेना), सचिन वाहुळे, नागेश पाटील, बबलू भालेराव, (पत्रकार दैनिक मीडिया वार्ता, उमरखेड), सुधाकर कदम, विष्णूभाऊ वाडेकर, विनोद दवणे, प्रतीक धोंगडे, प्रकाश वाहुळे, भीमराव हापसे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.














