


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड :- (दि.6 ऑक्टोंबर) तालुक्यातील मुळावा येथे अनेक दिवसापासून सुरु असलेल्या सरपंच बदलण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे.
मागील सरपंचा सौ ललिता रामराव जामकर यांनी अडीच वर्षाच्या फॉर्मुल्याचा दिलेल्या शब्द न पाळल्या मुळे मुळावा येथील महिला सरपंच सौ. ललिता रामराव जामकर यांच्याविरुद्ध सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलच्या 15 पैकी 12 ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे, ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप यासारख्या विविध कारणावरून उमरखेड तहसीलचे तहसीलदार आनंद देऊडगावकर यांच्याकडे दि. 3 ऑक्टोबर रोजी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला.
मुळावा येथील ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच ,उपसरपंच आणि 13 सदस्य असे एकूण 15 सदस्य संख्या असून सरपंच सौ. ललिता रामराव जामकर यांच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे, ग्रामपंचायतीच्या मीटिंग वेळेवर तसेच सदस्यांना विश्वासात न घेता करणे, सदस्यांना विचारात घेऊन कामकाज न करणे तसेच महिला सरपंच असल्याने संपूर्ण ग्रामपंचायत कारभार सरपंच पती पाहत असल्याचा आरोप करत राजेश जकाते,सुरज वाढेकर, राधाबाई मोरे,शारदा जाधव, संजीवनी पत्रे, मोहम्मद महजबीन, विजया बरडे,फर्जाना पिंजारी, शिवशंकर गोरे, गजानन पडघनकर, गणेश खडसे, संजय देशमुख या 12 ग्रामपंचायत सदस्यांनी उमरखेड तहसीलचे तहसीलदार आनंद देऊडगावकर यांच्याकडे दि. 3 ऑक्ट रोजी दुपारी साडेचार वाजता अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
या वेळी पॅनल प्रमुख तातु देशमुख व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हजर असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी तहसीलदार आनंद देऊडगावकर यांनी दि. 9 ऑक्टोम्बर रोजी दुपारी 2 वाजता ठरावावर चर्चा करण्यासाठी तसेच निर्णय घेण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये कलम 35(2) नुसार मुळावा ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे.
चौकट:- मुळावा ग्रामपंचायतच चे बहुसंख्य सदस्यांनी मुळावा येथील महिला सरपंचा ललिता रामराव जामकर यांच्यावर सहीनिशी अविश्वास ठराव दिला.
त्यावर 9 ऑक्टोबर दुपारी चर्चा करून शासकीय नियमाने उचित कार्यवाही करण्यात येईल.- आनंद देऊडगावकर (तहसीलदार उमरखेड)














