Home महाराष्ट्र ॲड.निरंजन पाईकराव यांना संविधान संरक्षक पुरस्कार प्रदान

ॲड.निरंजन पाईकराव यांना संविधान संरक्षक पुरस्कार प्रदान

131

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 6 ऑक्टोंबर)
उमरखेड व पुसद येथील न्यायालयात वकिली व्यवसायात आपला वेगळा ठसा पाडणारे वसंतनगर पोफळी सारख्या ग्रामीण भागात रहिवासी असलेले अडव्होकेट निरंजन वामन पाईकराव यांना प्रतिष्ठेचा असलेला “सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्कार” ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अडवोकेट्स अँड असोसिएशन न्यू दिल्ली यांच्याकडून देण्यात येणारा पुरस्कार दिनांक 28 जुलै 2023 रोजी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे प्रदान करण्यात आला

यावेळी राहुल पुरी, सुधाकर जाधव, दीपक नाईक,नितीन पुरी उपस्थित होते.

सदर पुरस्कार हा भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली व्यवसायाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन व नमूद दिल्ली येथील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अडवोकेट्स अँड असोसिएशन संघटनेने केले.

सदर पुरस्कार हा एडवोकेट निरंजन पाईकराव यांच्या वकिली व्यवसायातील नाविन्यपूर्ण गुणवत्ता, अतुट समर्पण, त्यांच्यामध्ये असलेला उपेक्षीतांना न्याय देण्याचा प्रयत्न, न्याय मिळवून देवुन समाज सुधारन्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला
त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई – वडील, पत्नी व इतर सर्व कुटुंबीय तसेच मित्र व वकिली व्यवसायात मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींना दिले आहे. या कार्यक्रमाला विधी क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ञ तसेच सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.

त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे पुसद उमरखेड तालुक्यातील बार कौन्सिल संघटनेतर्फे व परिसरातील मित्र मंडळी व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here