Home महाराष्ट्र स्थानिक नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी येथे स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन...

स्थानिक नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी येथे स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

359

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 15 ऑगस्ट):-ने.हि.कन्या विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ठिक 7:30 वाजता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बनपुरकर मॅडम यांच्या शुभहस्ते वंदनीय प्रतीमा राष्ट्रपिता महात्मा गांधी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतीमांचे पुष्पहार घालून ,पुजन करून, ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रगीताचे गायन बॅन्डपथका सह करण्यात आले तीरंग्याला सलामी देत झेंडा गीताचे गायन झाले.स्वातंत्र्य दिन चिरायु होवो,वंदे मातरम् भारतमाता की जय
अशा नाऱ्यानी आसमंद निनादले.

मा.मुख्याध्यापिका सौ. बनपुरकर मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत अनाम विरांच्या शौर्य त्याग ,देशसेवा,मातृभुमी च्या प्रेमाबद्दल बलिदानाच्या गाथा याबाबत मार्गदर्शन केले.एन सी सी पथकाचे निरीक्षण व पथसंचलन आठवण करून देत होती की ज्यांच्या पायात शिस्त त्यांच्या जीवनात शीस्त उत्कृष्ट अशा परेड द्वारा दाखवण्यात आले.याप्रसंगी मा. उपमुख्याध्यापक भैय्या सर व पर्यवेक्षक निखारे सर यांनीही मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्यात देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले.

आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध ,चित्र ,घोषवाक्य वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .गाईड पथक ,आर एस पी पथक ,शालेय विद्यार्थी नी शिक्षक वृंद,बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.तीन रंगाच्या उत्सहाने सजावटीने वातावरणात आनंद आणि देशाभिमान नविन प्रेरणा देत होते.सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने स्वातंत्र्य दिन सोहळा सःपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here