Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बुद्ध जयंती उत्साहात संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बुद्ध जयंती उत्साहात संपन्न

204

 

ब्रम्हपुरी (दि. 5 मे ):-

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे बुद्ध जयंती निमित्त अभिवादन तथा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदाचे सचिव डॉ. देवेश कांबळे यांनी भूषविले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानवी जीवन हे परिवर्तनशील आहे असे भाष्य करून जीवनाला सुखी, समृद्ध आणि आनंदमय करण्यासाठी तथागत भगवान बुद्धांच्या विचारांशिवाय पर्याय नाही असे भाष्य केले.

याप्रसंगी प्रा. भीमादेवी डांगे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मानवी जीवनात पंचशीलाचे महत्व या विषयावर विस्तारपूर्वक विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. भीमादेवी डांगे यांनी खमा याचना तर प्रा. रंगारी सर यांनी बुद्धवंदना घेतली. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले.
याप्रसंगी शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तथा कर्मचारी या मंगल प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here