Home महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ माजलगांव तालुका अध्यक्ष अमर साळवे, कोषाध्यक्ष समाधान गायकवाड तर...

पुरोगामी पत्रकार संघ माजलगांव तालुका अध्यक्ष अमर साळवे, कोषाध्यक्ष समाधान गायकवाड तर सचिव पदी राजरत्न डोंगरे यांची नियुक्ती.

176

 

माजलगांव (प्रतिनिधी.) आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्यावतीने बीड जिल्हा कार्यकारिणी आणि माजलगांव तालुका अध्यक्ष पदी अमर साळवे यांची निवड करुन नियुक्ती पत्र दिली. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा दशरथ रोडे , राज्य उपाध्यक्ष, भागवत वैद्य , चंद्रकांत कांबळे, उत्तर ओव्हाळ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे दि ४ मे. रोजी २०२३ गुरुवार रोजी बैठक संपन्न झाली.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ शाखा माजलगांव तालुका अध्यक्ष पदी – अमर साळवे सचिव राजरत्न डोंगरे तर कोषाध्यक्ष समाधान गायकवाड यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. माजलगांव तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी सुध्दा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

याप्रसंगी बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्वळ , उपाध्यक्ष अशोक जोगदंड, राम कठारे , सचिव राजकुमार धिवार, कार्याध्यक्ष. पृथ्वीराज निर्मळ, संघटक. शिवप्रसाद सिरसाठ , महाराष्ट्र राज्य गाव विकास( ग्रामदूत ) समितीच्या नवनिर्वाचित मराठवाडा अध्यक्ष, उत्तम ओव्हाळ, तर नवनिर्वाचित बीड अध्यक्ष पदी – सुर्यकांत उधारे माजलगाव तालुका अध्यक्ष अमर साळवे , सचिव राजरत्न डोंगरे, कोषाध्यक्ष समाधान गायकवाड, उपाध्यक्ष दर्शन डोंगरे, यांना राज्य कार्याध्यक्ष प्रा दशरथ रोडे, राज्य उपाध्यक्ष भागवत वैद्य, चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. याप्रसंगी पृथ्वीराज निर्मळ, संजय जोगदंड, राजरत्न डोंगरे, अन्य पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष. विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष- विजयकुमार वाव्हळ, महाराष्ट्र राज्यध्यक्ष , संतोष जाधव , राज्य सचिव निलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले.

प्रा. रोडे यांनी म्हणाले की, देशात व राज्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संघटक, संघटन, विस्तार अधिक वेगाने वाढत आहे. संघाच्या अंतर्गत विविध समित्यांची माहिती दिली. पंचवीस विविध क्षेत्रातील काम करण्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शैक्षणिक समिती, साहित्यिक समिती, आरोग्य समिती, सांस्कृतिक समिती, अन्याय अत्याचार समिती, कायदेशीर सल्लागार समिती, गाव तेथे ग्रामविकास समिती,
पर्यावरण व प्रदुषण निवारण समिती,महिला उद्योग रोजगार समिती, माहिती अधिकार समिती,रेशन दक्षता समिती,बळीराजा हक्क समिती,ग्रंथालय व कर्मचारी निवारण समिती,लोक कला जतन संस्कृती समिती,अपंग निवारण समिती, अन्य समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यासर्व विविध समित्यावर देशात व राज्यात कार्यरत आहेत. पाटेकर म्हणले की, पत्रकार , पत्रकारिता वृत्तपत्राचा विस्तार हे अत्यंत महत्त्वाचे कार्य व काम होय. सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी जागरूकता पत्रकाराने राहणे गरजेचे आहे. काळाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे. कोणतेही संघटन अत्यंत कठीण काम आहे.

परळी तालुकध्यपदी अमोल सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली तर उर्वरित परळी तालुका व शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. तालुका कार्यकारिणीच्या बैठकीस कार्यक्राचे अध्यक्ष
राज्य कार्याध्यक्ष प्रा दशरथ रोडे, प्रमुख पाहुणे राज्य उपाध्यक्ष भागवत वैद्य, चंद्रकांत कांबळे,नवनिर्वाचित अध्यक्ष उत्तम ओव्हाळ, नवनिर्वाचित बीड जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत उधारे, नवनिर्वाचित बीड जिल्हा अध्यक्ष. आत्माराम वाव्हळ, राजकूमार धिवार, पृथ्वीराज निर्मळ, अमर मिळावे, समाधान गायकवाड शिवप्रसाद सिरसाठ अन्य पदाधिकाऱ्यांना माजलगांव तालुक्यातील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

——————————००———————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here