


🔹वंदना गव्हाणे व भूषण सरदार यांनी दिल्या शुभेच्छा
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.28फेब्रुवारी):- सामान्य माणसाला चित्रपट सृष्टी मध्ये संधी मिळावी व गाव – खेड्यातील तरुणांचे कौशल्य विकसित व्हावे,त्यांच्यातील गुण बाहेर यावे यासाठी प्रेमरंग या फिल्म चे लेखक /निर्माता/दिग्दर्शक यशवंत मस्के तसेंच सहनिर्माता सिद्धेश्वर शिंदे हे मेहनत घेत आहेत व ज्यांच्यात खरच काही गुण आहेत अश्यांना संधी देण्याचे काम ते करत आहेत. प्रेमरंग या फिल्म मधून लोकांचे मनोरंजन व्हावे तसेच लोकांच्या जीवनातील नैराश्य दूर करून व ते पोट भरून हसावे यासाठी प्रेमरंग या फिल्म ची निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये श्रावणी शिरोळकर, पूजा ठाकर,दत्ता ठाकर,सुयश काजवे,यशवंत मस्के, सिद्धेश्वर शिंदे, पंढरीनाथ थोरात, नंदिनी नरुटे,प्रणव शिंदे, राजेंद्र नरुटे इत्यादी सर्व चित्रपट ची बाजू सांभाळणार आहेत. अभिनेत्री श्रावणी शिरोळकर यांनी इस्कुटवाडी या वेब फिल्म मध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे तसेच त्यांच्या प्रेमरंग या वेब फिल्म ची सर्विकडे चर्चा सुरु आहे. अभिनेत्री वंदना गव्हाणे व कथा लेखक भूषण सरदार यांनी त्यांच्या येणाऱ्या प्रेमरंग या वेब फिल्म साठी शुभेच्छा दिल्या आहेत.













