Home महाराष्ट्र पत्रकार शशिकांत वारिसे हत्येचा निषेधार्थ परभणीत पत्रकारांचे जोरदार निदर्शने

पत्रकार शशिकांत वारिसे हत्येचा निषेधार्थ परभणीत पत्रकारांचे जोरदार निदर्शने

197

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11फेब्रुवारी):-राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्त्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने परभणीत पत्रकारांनी जोरदार निदेर्शने आंदोलन केले . येथील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर सकाळी अकरा वाजता शहरातील पत्रकारानी काळ्या फिती लावून जोरदार निदेर्शने केली त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी , पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटूंबींयाना तात्काळ आर्थिक मदत द्यावी त्याच बरोबर पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सभ्य आणि सुसस्कृत भूमिका घेवून पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारावर हल्ले करुन किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतांना दिसतो. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते आहे. सातत्याने अशा घटना वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी सोमवारी कोदवली येथून दुचाकीने जात असतांना भरधाव वेगात येणार्‍या महेंद्रा थार गाडीने त्यांना धडक दिली. यात वारिसे यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे.

शशिकांत यांने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर हे हेाते. सकाळी विरोधात बातमी लागते अणि त्याच व्यक्तीची कार वारिसे यांच्या गाडीला धडक देते हा योगायोग नसून कट रचून केलेला खूनच असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या प्रकरणातील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्टट्रक कोर्टात करण्यात यावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार डॉ. आसाराम लोमटे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, विठ्ठलराव वडकुते, प्रभू दिपके, राजकुमार हट्टेकर, रमाकांत कुलकर्णी, डा. धनाजी चव्हाण, शिवशंकर सोनुने, मोईन खान, लक्ष्मण मानोलीकर, सुधाकर श्रीखंडे, संजय बगाटे, राजेश गोरे, रवि मानवतरकर, सय्यद जमिल, बाळासाहेब घिके, धनंजय नांदापूरकर, राहूल धबाले, उत्तम बोरसुरीकर, दिलीप बोरुळ, दत्रात्रय कराळे, किरण स्वामी, बाळासाहेब शिंदे, सुनिल सुतारे, संजय घनसावंत, शंकर झाटे, लक्ष्मीकांत बनसोडे, सय्यद खिजर, रियाज कुरेशी, मोहन धारासुरकर आदींसह पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here