


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.15जून):-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा संत गाडगेबाबा वृक्षारोपण अभियानांतर्गत अग्निपंख बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मौजा रामपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले.वृक्षारोपणामुळे भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा, पाणी व निरोगी पर्यावरण मिळण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित श्री. मारोती उरकुडे,भाऊराव बोबडे ,दरेकर काकाजी, गोरे आबाजी, पोडे काकाजी, काळे काकाजी, संस्थेचे सचिव सुरज गव्हाणे, रामपूर शाखा अध्यक्ष सुनील गौरकर, शाखा उपाध्यक्ष मंगेश उरकुडे, शाखा सहसचिव निखिल कावळे,स्वछ पर्यावरण अभियान प्रमुख विक्रम कोडीरपाल,कवडू पोडे,प्रफुल बोबडे,प्रदीप काटवले, शुभम जमपल्लवार, मनोज पोतराजे, मयूर घुगुल, साईनाथ पानघाटे, पंकज दरेकर, विशाल जानवे तसेच इतर सर्व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविला.















