Home महाराष्ट्र प्राचीन श्री गणपती मंदिराचे कार्य प्रगतीपथावर 

प्राचीन श्री गणपती मंदिराचे कार्य प्रगतीपथावर 

127

▪️यंदा साकोलीत नवनिर्मित नक्षीकाम मंदीरासह साजरा होणार जल्लोषात श्री गणेशोत्सव 

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

साकोली(दि.14जून):-मुख्य साकोली शहर गणेश वार्डातील सर्वात पुरातन श्री गणपती मंदिराचे नवनिर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. येथे सर्व गणेशभक्त मंडळ सदस्यगण या कार्याला हातभार लावित आहेत. यंदाचा श्री गणेशोत्सव हा नवनिर्मित मंदीरासह श्री बाल गणेश उत्सव मंडळ मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहेत अशी माहिती मंडळाने दिली आहे. 

            प्राचीन श्री गणपती मंदिराचे कार्य १५ दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे. हे नवनिर्मित मंदीर राजस्थान वरून आलेल्या नक्षीकाम व आकर्षक गजचिन्हीत दगडांपासून उभे होत आहे. शुक्रवारी ता. १२ जूनला येथील आठही खांब क्रेनने मोठ्या सतर्कतेने उभे करण्यात आले. या पुण्य मंदिर निर्माण कार्यात श्री बाल गणेश उत्सव मंडळातील सर्व सदस्य, गणेश वार्ड निवासी मोठ्या भक्तिभावाने बांधकाम कार्यात दररोज हातभार लावित आहेत. या ऑगस्ट महिन्यात हे दिव्य दिपमान नविन मंदिर उभे होणार असून सोमवार १४ सप्टेंबर श्री गणेश चतुर्थीला गणेश मंदिर चौकात दुय्यम जल्लोषात श्री गणपती मुर्ती महापुजन व श्री गणेशोत्सव मंडळ वतीने श्रींच्या मूर्तीची स्थापना केली जाईल हे विशेष. 

           जिल्ह्यातील सर्वात प्राचीन आणि शहरातील एकमेव श्री गणपती मंदिर देवस्थानच्या जिर्णोद्धाराला सर्व जनतेने सढळ हाताने सहकार्य करावे असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान साकोली व श्री बाल गणेश उत्सव मंडळ, गणेश मंदिर चौक, गणेश वार्ड साकोली येथील सर्व पदाधिकारी, सदस्यगण व प्रभागवासियांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here