


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१०जून):- भारत सरकारच्या जनगणना २०२७ अंतर्गत घरमोजणी टप्प्याचे शंभर टक्के काम नियोजित मुदतीपूर्वी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रगणक बादल एन. बेले यांना नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी विवेक भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
जनगणना प्रक्रियेदरम्यान तीव्र उष्णता, वाढते तापमान तसेच विविध क्षेत्रीय अडचणी असूनही बादल बेले यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून अचूक माहिती संकलित करण्याचे कार्य अत्यंत समर्पणाने पूर्ण केले. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे घरमोजणीचे काम मुदतीपूर्वी शंभर टक्के पूर्ण होण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.
यावेळी मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी जनगणना हे देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगत, प्रगणकांच्या मेहनती व सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. पुढील जनगणना टप्प्यांमध्येही याच उत्साहाने आणि जबाबदारीने कार्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशस्तीपत्र स्वीकारल्यानंतर बादल बेले यांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानत जनगणना कार्यात सहकार्य करणाऱ्या नागरिकांचेही विशेष आभार व्यक्त केले.
*छायाचित्र ओळ*
जनगणना २०२७ अंतर्गत घरमोजणी टप्प्याचे शंभर टक्के काम मुदतीपूर्वी पूर्ण केल्याबद्दल प्रगणक बादल एन. बेले यांना नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी विवेक भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.















