Home चंद्रपूर चंद्रपुरात ‘संडे ऑन सायकल रॅली’चे आयोजन

चंद्रपुरात ‘संडे ऑन सायकल रॅली’चे आयोजन

49

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.10जून):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपुरच्या वतीने संडे ऑन सायकल रॅली घेण्यात आली. या रॅलीची सुरवात बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल येथून झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले.

विविध गटातील नागरिकांनी, खेळाडूंनी एकत्र येत ‘अर्धा तास रोज, फिटनेस का डोज’ चा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. या सायकल रॅलीदरम्यान खेळाडूं‌नी, नागरिकांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्व अधोरेखित केले. सायकलचा नियमित वापर केल्यास शारीरिक तंदूरुस्ती वाढते. इंधनाची बचत होवून पर्यावरणाचे रक्षण होते, असे मत अनेक खेळाडूंनी व्यक्त केले.             

चंद्रपूर शहरात घेण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता आरोग्यविषयक जनजागृती करणारी चळवळ ठरावी. या माध्यमातून नागरिकांमध्ये सायकलची आवड वाढावी व दर रविवारी असा उपकम राबविला जावा, अशी अपेक्षा जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी व्यक्त केली. सदर रॅली आंबेडकर कॉलेज, रामनगर रोड, पाण्याची टाकी, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवास, बॅडमिंटन हॉल जिल्हा क्रीडा संकुल या मार्गाने जावून रॅलीचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर संदीप उईके, विठ्ठल भालेराव, नंदू अवारे, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, मनोज पंधराम, रोशन भुजाडे, विजय डोबाले, क्रीडा मार्गदर्शक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here