


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.10जून):-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षक अंतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान सन 2026-27 अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तूर 50 टक्के अनुदानावर तसेच तूर मिनीकिट 100 टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली अर्ज करावा
अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे करीता अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.















