Home महाराष्ट्र गंगाखेड नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी राम मुंडे यांचे सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न..

गंगाखेड नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी राम मुंडे यांचे सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न..

117

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.6मे):-नगरपरिषद कार्यालयातील स्वच्छता कर्मचारी राम मुंढे यांचा सेवा निवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले सत्कार समारंभ हा सेवानिवृत्त कार्यक्रम गंगाखेड नगरपरिषद सभागृहात घेण्यात आला या कार्यक्रमांतून त्यांच्या दीर्घ व निष्ठेने केलेल्या सेवेचा गौरव करण्यात आला.

यावेळी गंगाखेड नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक नागनाथ साळवे स्वच्छता निरिक्षक सागर जगतकर साह्यक स्वच्छता निरिक्षक जालेदर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राम मुजाजी मुंडे यांनी गंगाखेड नगरपरिषद कार्यालयात वयाच्या ६०वर्षीपर्यत गंगाखेड शहरातील स्वच्छता विभागात स्वच्छता कर्मचारी म्हणून रूजु होते 

राम मुंडे यांच्या सह त्यांच्या परिवाराचा यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी स्वच्छता निरिक्षक सागर जगतकर यांनी राम मुंडे यांच्या कामाची पध्दत आणी त्यांच्या समोर अनुभवलेला वेळ त्यांनी यावेळी सागर जगतकर यांनी आपल्या शब्दातुन बोलुन दाखवले तसेच राम मुंडे यांना पुढील आयुष्य आरोग्यमय आणी आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अजित घोबाळे बंन्टी कचरे शेख साहिल यांच्या सह गंगाखेड नगरपरिषदेचे कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here