Home चंद्रपूर लिटिल फ्लॉवर स्कूल परिसरात कोचिंगचा अवैध खेळ: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक...

लिटिल फ्लॉवर स्कूल परिसरात कोचिंगचा अवैध खेळ: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई–NSUI ची मागणी

52

✒️गोंदिया(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

गोंदिया(दि.10एप्रिल):-भारतीय राष्ट्रीय छात्र संघटना (NSUI) गोंदिया चे माजी जिल्हाध्यक्ष हरीश तुलसकर यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी, गोंदिया यांना एक गंभीर तक्रार सादर करून गोंदिया शहरातील हड्डी टोली परिसरातील लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या “Catalyzer” या खाजगी कोचिंग संस्थेविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित कोचिंग संस्थेमार्फत शाळेच्या परिसरात JEE व NEET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी वर्ग चालविले जात आहेत, जे शासकीय नियमांच्या विरोधात आहे. नियमांनुसार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेच्या परिसराचा वापर खाजगी कोचिंग किंवा व्यावसायिक उपक्रमांसाठी करता येत नाही.

NSUI ने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की या प्रकरणात केवळ शाळा व्यवस्थापनच नव्हे तर “Catalyzer” ही कोचिंग संस्था देखील तितकीच दोषी आहे. हा प्रकार शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम करणारा आहे.

हरीश तुलसकर यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी,

दोषी संस्थांवर कडक प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी,

भविष्यात अशा प्रकारांच्या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी कडक निर्देश जारी करण्यात यावेत.

NSUI कडून इशारा देण्यात आला आहे की, या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास संघटनेतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन व प्रशासकीय घेराव करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here