


▪️व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यव्यापी आंदोलनाला परभणीत मोठा प्रतिसाद
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.8एप्रिल):-राज्यभरात पत्रकारांवर होत असलेले हल्ले, धमकावणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडीया संघटनेच्या वतीने मंगळवार, दिनांक ७ एप्रिल रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील संपादक, पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी राज्य सरचिटणीस सुरज कदम, राज्य सहसंघटक विजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले.
आंदोलनप्रसंगी बोलताना विजय चोरडिया म्हणाले की, पत्रकार समाजाचा आरसा असून सत्य मांडल्यामुळे त्यांच्यावर हल्ले होत आहेत. पत्रकारांना धमक्या दिल्या जात असून खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे प्रकार वाढले आहेत. या अन्यायाविरोधात राज्यभर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
पत्रकार सुरक्षा कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अधिस्वीकृतीसाठी असलेले अटी व नियम शिथिल करावेत, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी, तसेच लघु दैनिक व साप्ताहिकांच्या जाहिरात दरात वाढ करावी, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
या जिल्हास्तरीय धरणे आंदोलनात मराठवाडा कार्यकारणी पदाधिकारी विशाल माने, सुरेश जंपनगिरे यांच्यासह जिल्हा कार्यकारणीतील बालासाहेब काळे, नरहरी चौधरी, राजन मंगरूळकर, मारुती जुंबडे, विजय कुलकर्णी, सुधीर बोर्डे, लक्ष्मीकांत रासवे, विष्णू सायगुंडे, दिलीप बोरुळ, ज्ञानेश्वर उंडाळ, अनिल अहिरे, रियाज कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.














