


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.५एप्रिल):-राजुरा तालुक्यातील पंचाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विषय शिक्षिका कु.मोहिनी शामराव देशमुख यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. त्यामध्ये पंचाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची शिक्षिका मोहिनी देशमुख यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याने तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील निगडी परिसरातील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
२९ मार्च रोजी या विशेष सोहळ्यात ध्येय फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेंडगे व जागतिक स्तरावर जिल्हा परिषद शाळेचा ठसा उमटविणारे आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या हस्ते शॉल , श्रीफळ , स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मोहिनी देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राहुलदादा कुल , उमाताई खापरे, अमित गोरखे व अरुण लाड उपमहापौर ,शर्मिला बाबर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकार , राष्ट्रपती पारितोषिक सन्मानित प्राचार्य नंदकुमार सागर , राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुभाष अडवे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य ,शिक्षक व शिक्षिका यांनी शुभेच्छा दिल्या.














