


✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.2एप्रिल):-साखरी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे व कार्तिक गोरे या पितापुत्रांनी साखरी – निर्ली शेत शिवारात पाणपोई सुरू केली आहे. सोबतच पाणपोई लगतच्या नाल्यात पाईप च्या मदतीने पाणी सोडून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
साखरी गावातील दानशूर व्यक्तिमत्व सुभाष गोरे व कार्तिक गोरे या पितापुत्रांनी स्वर्गीय बाळा चि. गोरे,अंजनाबाई चि.गोरे, चिमणा बाल्या गोरे व गणेश गोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ साखरी – निर्ली शेत शिवारात पाणपोई सुरू केली आहे. तसेच लगतच्या नाल्यात पाणी सोडून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे भर उन्हात परिसरातील नागरिकांची तहान भागत आहे.
नाले कोरडे पडल्याने जनावरांचा पिण्याचे पाणी मिळत नव्हते. मात्र या गोरे पितापुत्रांनी पाईप च्या मदतीने नाल्यात पाणी सोडून जनावरांसाठी पाण्याची सोय करून दिली आहे. त्यांनी पाणपोई सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे. आदिवासी नेते वाघुजी गेडाम, सुरेश मिलमिले, विनोद ढोबे, दत्ता शिरसागर,विनोद अस्वले, शालिक कोडपे, सुरेंद्र आवरी, केतन धांडे, सतीश मासे आदी ग्रामस्थांनी पाणपोईला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.














